ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: देशातील हायकोर्टांमध्ये 65 लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित; न्यायासाठी नागरिक अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » देशातील हायकोर्टांमध्ये 65 लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित; न्यायासाठी नागरिक अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत
देश-विदेश

देशातील हायकोर्टांमध्ये 65 लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित; न्यायासाठी नागरिक अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 8:43 am
Gramin Varta
17 Views
Share

दिल्ली: भारतीय न्यायव्यवस्थेतील प्रलंबित खटल्यांचा वाढता भार आणि न्याय मिळण्यास होणारा प्रदीर्घ विलंब याचे पुन्हा एकदा चिंताजनक चित्र समोर आले आहे.

देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये 65 लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित असून, त्यामुळे अनेक नागरिकांना न्याय मिळण्यासाठी दशकानुदशके प्रतीक्षा करावी लागत आहे.

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील एका कर्मचाऱ्याला 1999 मध्ये रोजंदारीवरील कर्मचारी म्हणून नोकरीतून कमी करण्यात आले होते. याविरोधात त्यांनी जोधपूर कामगार न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत 2004 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे याचिका दाखल करून 22 वर्षे उलटूनही तिची सुनावणी पूर्ण झालेली नाही. अखेर याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी संबंधित याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. या प्रकरणावर भारताचे सरन्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी केली. न्यायालयाने याचिकेवर विचार करण्यासाठी कोणताही आधार नसल्याचे नमूद केले. मात्र, याचिकाकर्त्याला संबंधित उच्च न्यायालयात लवकर सुनावणीसाठी अर्ज करण्याची मुभा दिली.

देशातील प्रमुख हायकोर्टातील प्रलंबित प्रकरणे

अलाहाबाद उच्च न्यायालय : सुमारे 12.5 लाख प्रकरणे प्रलंबित.

राजस्थान उच्च न्यायालय : सुमारे 7 लाख प्रकरणे प्रलंबित.

मुंबई उच्च न्यायालय : सुमारे 6.4 लाख प्रकरणे प्रलंबित.

मद्रास उच्च न्यायालय : सुमारे 5.6 लाख प्रकरणे प्रलंबित.

मध्य प्रदेश उच्च न्यायालय : सुमारे 4.9 लाख प्रकरणे प्रलंबित.

कर्नाटक उच्च न्यायालय : सुमारे 3.3 लाख प्रकरणे प्रलंबित.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालय : सुमारे 2.5 लाख प्रकरणे प्रलंबित.

कलकत्ता उच्च न्यायालय : सुमारे 1.9 लाख प्रकरणे प्रलंबित.

दिल्ली उच्च न्यायालय : सुमारे 1.2 लाख प्रकरणे प्रलंबित.

तब्बल 15 लाख प्रकरणे 10 वर्षांपासून प्रलंबित

देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये सुमारे 15 लाख प्रकरणे अशी आहेत, जी 10 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. प्रकरणांचा वाढता भार न्यायालयांच्या कामकाजावर आणि न्यायदानाच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम करत असल्याचे चित्र आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, नागरिकांना आपल्या प्रकरणांचा अंतिम निकाल लवकर मिळावा यासाठी नव्हे, तर सुनावणीची तारीख लवकर मिळावी, यासाठीही सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयावरील खटल्यांचा ताणही वाढत आहे.

Total Visitors :

5427414
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नायरी गावात मोबाईल नेटवर्कचा पुरता बोजवारा; सेवा पूर्ववत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
2 Min Read

नवरात्रोत्सवाच्या तोंडावर ‘रेंट अ गरबा पार्टनर’च्या फसव्या जाहिराती; मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Gramin Varta
2 Min Read

Investigating the Extraordinary Nature of the Physical World

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

भारतात पहिल्यांदाच ऐतिहासिक नोंद; आसामच्या दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यानात आढळली दुर्मीळ परजीवी गांधीलमाशीची अज्ञात प्रजाती

2 Min Read
देश-विदेश

कॅनडात विमान प्रशिक्षणादरम्यान अपघात; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

2 Min Read
देश-विदेश

नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी अमेरिकेची ३१ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर ; पूल, निवारा आणि ड्रोनसाठी निधी

2 Min Read
देश-विदेश

हिऱ्यात साक्षात विघ्नहर्त्याचे रूप; सुरतमधील ६१८.२७ कॅरेटचा अद्भूत रफ डायमंड दर्शनासाठी खुला, मूल्य कोट्यवधींच्या घरात

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?