ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कॅनडात विमान प्रशिक्षणादरम्यान अपघात; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कॅनडात विमान प्रशिक्षणादरम्यान अपघात; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
देश-विदेश

कॅनडात विमान प्रशिक्षणादरम्यान अपघात; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 2:32 pm
Gramin Varta
171 Views
Share

दिल्ली : कॅनडामध्ये विमान प्रशिक्षणादरम्यान झालेल्या एका दुर्दैवी विमान दुर्घटनेत दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची पुष्टी कॅनडातील भारतीय दूतावासाच्या व्हॅंकुव्हर येथील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने केली आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची ओळख तामिळनाडूतील मनोज शिवकुमार आणि पुद्दुचेरीतील श्रीसरन तिरुग्नानसंबंधम अशी झाली आहे. भारतीय दूतावासाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी कॅनडामध्ये व्यावसायिक वैमानिक आणि विमान वाहतूक प्रशिक्षणाचा भाग म्हणून उड्डाणाचा सराव करत होते.त्याचदरम्यान हा अपघात झाला आणि त्यात दोन्ही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.भारतीय दूतावासाने हेही स्पष्ट केले आहे की, ते सातत्याने स्थानिक प्रशासन आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही मृत विद्यार्थ्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ राज्यात सन्मानपूर्वक परत आणण्याच्या प्रक्रियेत कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे.

या घटनेनंतर दोन्ही विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाकडून या विमान दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.दरम्यान, विमान दुर्घटनेबद्दल व्हॅंकुव्हर येथील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने रविवारी शोक व्यक्त केला.

दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “व्हॅंकुव्हर येथील भारताचा महावाणिज्य दूतावास तामिळनाडूतील मनोज शिवकुमार आणि पुद्दुचेरीतील श्रीसरन तिरुग्नानसंबंधम यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो. कॅनडामध्ये विमान प्रशिक्षणादरम्यान झालेल्या एका दुर्दैवी विमान दुर्घटनेत दोन्ही भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.”

दूतावासाने पुढे म्हटले, “या कठीण प्रसंगी आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्टांसोबत आहेत. मृतदेह भारतात आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व वाणिज्य दूतावासीय मदत करण्यास आम्ही तयार आहोत.”

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला

Gramin Varta
3 Min Read

गणेशोत्सवात साकारली ‘श्री समर्थ बैठक’; वनगुळे-सुतारवाडीतील पंकज पांचाळ यांच्या कलाकृतीने वेधले लक्ष

Gramin Varta
2 Min Read

झहीर खान यांची चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

भारतात पहिल्यांदाच ऐतिहासिक नोंद; आसामच्या दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यानात आढळली दुर्मीळ परजीवी गांधीलमाशीची अज्ञात प्रजाती

2 Min Read
देश-विदेश

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास हायकोर्टाची मनाई

2 Min Read
देश-विदेश

राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा; 16 ऑक्टोबरला मतदान

2 Min Read
देश-विदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी ४८ तासांचा इशारा; एसआयआर मुद्यावरून ‘कॉक्रोच जनता पक्ष’ आक्रमक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?