ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड: चाकाळे येथे जुन्या वैमनस्यातून भरदिवसा रक्तरंजित राडा; बांबूच्या काठीने बेदम मारहाण करत एकाला केले गंभीर जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड: चाकाळे येथे जुन्या वैमनस्यातून भरदिवसा रक्तरंजित राडा; बांबूच्या काठीने बेदम मारहाण करत एकाला केले गंभीर जखमी
खेड

खेड: चाकाळे येथे जुन्या वैमनस्यातून भरदिवसा रक्तरंजित राडा; बांबूच्या काठीने बेदम मारहाण करत एकाला केले गंभीर जखमी

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 5:41 pm
Gramin Varta
39 Views
Share

खेड : जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून घरासमोर बसलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना चाकाळे हनुमाननगर येथे घडली आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, याप्रकरणी खेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाकाळे हनुमाननगर येथील रहिवासी राजेश सखाराम कदम (वय ४५) हे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ललिता घाणेकर यांच्या भाड्याच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी जुन्या वादाचा राग उफाळून आल्याने आरोपींनी कदम यांना गाठून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले आणि आरोपींनी कदम यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या दरम्यान संशयित आरोपी दीपक पांडुरंग भिलारे याने सोबत आणलेल्या बांबूच्या काठीने कदम यांच्या डोक्यात, दोन्ही हातांवर, पाठीवर तसेच छातीवर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात कदम हे रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर राजेश कदम यांनी खेड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपक पांडुरंग भिलारे, पुष्पा पांडुरंग भिलारे आणि दीपक भिलारे यांचा मुलगा (सर्व रा. चाकाळे जगदीशनगर, ता. खेड) या तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भरदिवसा घडलेल्या या मारहाणीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, खेड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5427459
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा डाव फसला; सोनाराच्या सतर्कतेने महिला जेरबंद

Gramin Varta
1 Min Read

खेर्डीत तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

Gramin Varta
2 Min Read

पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

Apple Pay Celebrates Milestone: Surpasses X Billion Transactions Mark

7 Min Read
खेड

खेड : बोरघर-राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून पाच हजारांची रोकड लंपास

1 Min Read
खेड

Exploring the Transformative Waves in Modern Technology

7 Min Read
खेड

Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway

Sponsored by
Sponsored by

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?