ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘Bappa.org’वरून रत्नागिरीच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर मांडा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘Bappa.org’वरून रत्नागिरीच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर मांडा
रत्नागिरी

‘Bappa.org’वरून रत्नागिरीच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर मांडा

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 3:47 pm
Gramin Varta
22 Views
Share

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे जिल्हावासीयांना आवाहन; घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याची संधी

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या बाप्पाची वैशिष्ट्यपूर्ण कथा जगासमोर आणावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

‘Bappa.org’ या डिजिटल मंचावर जिल्हावासीयांना आपल्या घरातील तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, अनुभव, परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. घरातील किंवा सार्वजनिक गणेश मंडळाची पारंपरिक आरती रेकॉर्ड करून अपलोड करण्यासोबतच गणरायाची छायाचित्रे, गणेशोत्सवाशी संबंधित खास पाककृती, प्रथा-परंपरा आणि उत्सवाच्या विविध पैलूंची माहितीही या माध्यमातून जगासमोर मांडता येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती गणेशोत्सव तसेच पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांची या उपक्रमांतर्गत नोंद केली जाणार आहे. यामध्ये स्थानिक श्रद्धा, प्रथा, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, आरतीच्या परंपरा, नैवेद्य आणि गणेशोत्सवाशी निगडित विविध लोकपरंपरांचाही समावेश होऊ शकतो. त्यामुळे कोकणच्या मातीत रुजलेल्या गणेशोत्सवाच्या अनोख्या परंपरांना व्यापक व्यासपीठ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख निर्माण करणाऱ्या या परंपरा पुढील पिढ्यांसाठी जतन व्हाव्यात आणि त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले. “जिल्हावासीयांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या घरातील, गावातील आणि परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जगासमोर आणाव्यात. आपल्या बाप्पाची कथा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा डिजिटल माध्यमातून जतन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले

Gramin Varta
2 Min Read

देवळे येथे नसरे परिवाराची पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट; बांबू आणि गवतातून साकारले शेतकरी-निसर्गाचे अतूट नाते

Gramin Varta
1 Min Read

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Gramin Varta
2 Min Read

हवामान बदल आणि वाढत्या खर्चाने मच्छीमार संकटात; उत्पादनात वाढ होऊनही आर्थिक कोंडी कायम, ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

1 Min Read
रत्नागिरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: अरेबियन समुद्रात इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू; जयगड सागरी पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?