ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचा मूकमोर्चा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचा मूकमोर्चा
रत्नागिरी

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचा मूकमोर्चा

Gramin Varta
Last updated: October 5, 2026 2:45 pm
Gramin Varta
124 Views
Share

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची व ईव्हीएम बंद करण्याची मागणी

रत्नागिरी: भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत रत्नागिरीत काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेच्या माध्यमातून मत चोरी होत असल्याचा दावा करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मूकमोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर, सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेश सरचिटणीस रमेश कीर म्हणाले की, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी सध्या तिच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एसआयआरच्या नावाखाली गोंधळ सुरू असून, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर त्यांच्याच सहकाऱ्यांनी वारंवार आक्षेप नोंदवूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.” काँग्रेस नेते राहुल गांधी या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगत, हे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवून आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे यांनी २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या ‘लोकशाही बचाव आंदोलना’चा हा भाग असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तीन प्रमुख मागण्या मांडल्या ज्यात महाराष्ट्रातील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणारी ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी. या गोंधळास जबाबदार धरून मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

पारदर्शकता जपण्यासाठी ईव्हीएम ऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दिला आहे.

Total Visitors :

5468552
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पोलीस कोठडीतील छळ आणि मारहाणीमुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना ५ लाखांची भरपाई

Gramin Varta
1 Min Read

महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ; लांजा नगरपंचायतीतर्फे दिवाळी वस्तू प्रदर्शन सुरू

Gramin Varta
2 Min Read

हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

Gramin Varta
2 Min Read

सणासुदीच्या काळात रास्त धान्य दुकानांतून साखर, तेल, मैद्याचा पुरवठा करा; ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: शिरगावात अज्ञात चारचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; धडक देऊन चालक पसार

2 Min Read
रत्नागिरी

अन्न व औषध प्रशासनाचा दणका; जिल्ह्यातील २३ आस्थापनांचे परवाने निलंबित, त्रुटींची पूर्तता केल्यानंतर १६ दुकानांचे शटर पुन्हा उघडले

1 Min Read
रत्नागिरी

ब्रेकिंग: लांजा, खेड आणि मंडणगडसह राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; राज्य शासनाचा मोठा निर्णय

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या आयटीआयचे देशपातळीवर झळाळते यश; अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण देशात प्रथम

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?