ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग: लांजा, खेड आणि मंडणगडसह राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; राज्य शासनाचा मोठा निर्णय
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग: लांजा, खेड आणि मंडणगडसह राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; राज्य शासनाचा मोठा निर्णय
रत्नागिरी

ब्रेकिंग: लांजा, खेड आणि मंडणगडसह राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; राज्य शासनाचा मोठा निर्णय

Gramin Varta
Last updated: October 14, 2026 2:51 pm
Gramin Varta
921 Views
Share

मुंबई : राज्यातील खरीप हंगाम २०२६ दरम्यान उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पावसाळ्याच्या अखेरीस जून ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पडलेला अपुरा पाऊस आणि इतर प्रतिकूल घटकांमुळे बाधित झालेल्या भागात ‘ट्रिगर-१’ व ‘ट्रिगर-२’ निकष लागू झाले आहेत. या निकषांनुसार मदत व पुनर्वसन विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत शासन निर्णय जारी करून हा दुष्काळ जाहीर केला. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, खेड आणि मंडणगड या तालुक्यांसह रत्नागिरी, संगमेश्वर व राजापूर अशा एकूण सहा तालुक्यांचा या दुष्काळी यादीत थेट समावेश करण्यात आला आहे.

दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या सर्व तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्व्हेक्षण क्षेत्रातील पिकांची नेमकी स्थिती दर्शवणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून कृषी आयुक्तांमार्फत शासनाला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष दिलासा योजना लागू करण्यात आल्या आहेत. बाधित तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जवसुलीस स्थगिती तसेच साडेसात हॉर्सपॉवरपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात विशेष सूट देण्यात येणार आहे. याशिवाय टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी तोडण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची सोय आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचे नियोजन युद्धपातळीवर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील मजुरांना आधार देण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) कामांचे निकष शिथिल करून जास्तीत जास्त कामे सुरू केली जाणार आहेत. तसेच विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा देताना शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात संपूर्ण माफी देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीपोटी द्यावयाची थेट आर्थिक मदत आवश्यक ती विहित प्रक्रिया पूर्ण करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही मदत व पुनर्वसन विभागाने नमूद केले आहे.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मालवणात ‘अशा या दोघी’ नाटकाचा विशेष प्रयोग; ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांची प्रमुख उपस्थिती

Gramin Varta
2 Min Read

नाशिकमध्ये धार्मिक विधीच्या बहाण्याने आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार; फरार भोंदूबाबा खंडेश्वर महाराज गजाआड

Gramin Varta
1 Min Read

वाटद एमआयडीसी भूसंपादन राजपत्राविरोधात सहा गावे एकवटली; बागायती जमिनी वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

कोकण-धुळे थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीला गती; धुळे स्थानकाच्या टर्मिनल विकासासाठी खासदार नारायण राणे यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

2 Min Read
रत्नागिरी

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची यशस्वी मोहोर

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : नाचणे येथे मणक्याच्या आजाराला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या आयटीआयचे देशपातळीवर झळाळते यश; अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण देशात प्रथम

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?