ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मालवणात ‘अशा या दोघी’ नाटकाचा विशेष प्रयोग; ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांची प्रमुख उपस्थिती
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मालवणात ‘अशा या दोघी’ नाटकाचा विशेष प्रयोग; ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांची प्रमुख उपस्थिती
राजापूर

वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मालवणात ‘अशा या दोघी’ नाटकाचा विशेष प्रयोग; ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांची प्रमुख उपस्थिती

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 6:33 pm
Gramin Varta
4 Views
Share

राजन लाड/जैतापूर : आपल्या सिद्धहस्त लेखणीतून मालवणी बोलीभाषा सातासमुद्रापार पोहोचवणारे आणि मालवणी भाषेला जागतिक रंगभूमीच्या पटलावर मानाचे स्थान मिळवून देणारे राजापूर तालुक्यातील माडबन गावचे सुपुत्र, ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार कैलासवासी गंगाराम महादेव गवाणकर यांचा प्रथम स्मृतिदिन २८ ऑक्टोबर रोजी मालवणमध्ये विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा होत आहे. मालवणच्या मातीशी अतूट नाते जपणारे गवाणकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी त्यांच्या अजरामर लेखणीतून साकारलेल्या ‘अशा या दोघी’ या दोन अंकी नाटकाच्या विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात २८ ऑक्टोबर रोजी रंगणाऱ्या या सोहळ्यात सायंकाळी ठीक ६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कैलासवासी गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येणार असून त्यांच्या जीवनप्रवासाला व स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. त्यानंतर लगेचच ‘अशा या दोघी’ या नाटकाचा प्रयोग सुरू होईल. विशेष म्हणजे, रामानंद सागर यांच्या जगप्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेत राजा दशरथाची अजरामर भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीत गवाणकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यात येणार आहे.

अष्टपैलू कलानिकेतन आयोजित आणि देऊळकर प्रॉडक्शन निर्मित या नाटकाची निर्मिती रोहिणी रवींद्र देऊळकर यांनी केली असून, कै. गवाणकरांचे परममित्र आणि ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र देवधर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकात राजेंद्र कदम, कुणाल आंगणे, संजीव शेडगे, योगिता सावंत, जितू तिरोडकर आणि मिनु देऊळकर हे मातब्बर कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. या नाटकाला प्रफुल्ल गोसावी यांचे संगीत लाभले असून, प्रकाश योजना धनश्री कुमठेकर यांनी केली आहे. रंगभूषा जितू तिरोडकर यांची तर निर्मिती सहाय्य सुजाता शेलटकर आणि सुनिल परुळेकर यांनी सांभाळले आहे.

कै. गंगाराम गवाणकर यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मालवण येथील कलाकार आणि मित्रपरिवाराने या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन केले असून हा प्रयोग सर्व नाट्यप्रेमींसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. मालवणातील तसेच संपूर्ण कोकणातील रसिक प्रेक्षकांनी आणि नाट्यप्रेमींनी सायंकाळी ६.०० वाजल्यापासूनच मोठ्या संख्येने उपस्थित राहून कै. गवाणकरांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे भावूक आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :

5469270
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रेनो ट्रायबरमध्ये आता टर्बो पेट्रोल इंजिन; १०० पीएस पॉवरसह नवीन मॉडेल लाँच

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी : निरूळ येथील जंगलात आढळला गळफास घेतलेला अनोळखी तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
1 Min Read

गणपती विशेष रेल्वेगाड्यांमध्ये अस्वच्छतेचा कहर; चाकरमान्यांचा संताप, डबे-शौचालयांच्या अवस्थेचे व्हिडीओ व्हायरल

Gramin Varta
3 Min Read

कोकण प्रदेशातील पर्यटनातून रोजगाराच्या संधींवर चर्चासत्र उत्साहात

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

नाणार-इंगळवाडी खाडी दुर्घटनेतील बेपत्ता मुलीसाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची बोटीतून शोधमोहीम

2 Min Read
राजापूर

जामदा धरण मोबदला घोटाळा: अस्तित्वात नसलेली झाडे दाखवून शासकीय निधी लाटल्याचा मनसेचा गंभीर आरोप; राजापूर पोलिसांत तक्रार दाखल

2 Min Read
राजापूर

रत्नागिरी पोलिसांच्या ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत खरवते येथे सायबर गुन्हेगारी व सुरक्षिततेबाबत जनजागृती

1 Min Read
राजापूर

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?