ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गणपती विशेष रेल्वेगाड्यांमध्ये अस्वच्छतेचा कहर; चाकरमान्यांचा संताप, डबे-शौचालयांच्या अवस्थेचे व्हिडीओ व्हायरल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गणपती विशेष रेल्वेगाड्यांमध्ये अस्वच्छतेचा कहर; चाकरमान्यांचा संताप, डबे-शौचालयांच्या अवस्थेचे व्हिडीओ व्हायरल
महाराष्ट्र

गणपती विशेष रेल्वेगाड्यांमध्ये अस्वच्छतेचा कहर; चाकरमान्यांचा संताप, डबे-शौचालयांच्या अवस्थेचे व्हिडीओ व्हायरल

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 11:03 am
Gramin Varta
21 Views
Share

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढलेली असतानाच गणपती विशेष रेल्वेगाड्यांमधील अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या जात असल्या, तरी अनेक डब्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. अस्वच्छ शौचालये, वॉश बेसिन आणि डब्यांमधील दुर्गंधीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणाच्या दिशेने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील अस्वच्छतेचे व्हिडीओ प्रवाशांकडून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. विशेष रेल्वेगाड्यांमधील फाटलेल्या सीट, घाणीने भरलेली शौचालये आणि स्वच्छतेअभावी खराब झालेली वॉश बेसिनची अवस्था या व्हिडीओमधून समोर आली आहे. या परिस्थितीवर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने तातडीने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा रेल्वे प्रशासनाने तब्बल ३८६ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या मार्गावर चार अतिरिक्त विशेष फेऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी रेल्वेने प्रवास करण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाखांहून अधिक प्रवाशांनी आरक्षण केले आहे. प्रत्यक्षात आरक्षणाव्यतिरिक्तही मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेचा वापर करत असल्याने कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी आहे. अशा परिस्थितीत डब्यांमधील स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

नियमित गाड्यांमध्येही अस्वच्छतेच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. विशेषतः कोकणकन्या एक्स्प्रेस आणि तुतारी एक्स्प्रेसच्या स्लीपर तसेच सर्वसाधारण डब्यांमधील शौचालय आणि वॉश बेसिनच्या स्थितीबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी शौचालयांमध्ये पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. या दोन्ही गाड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवासी मिळत असल्याने त्यांच्या स्वच्छतेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.

विशेष रेल्वेगाड्यांची अवस्था याहूनही चिंताजनक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दुपारी आणि रात्रीच्या वेळेत धावणाऱ्या काही विशेष गाड्यांना जुन्या डब्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे फाटलेल्या आसनांपासून ते अस्वच्छ शौचालये आणि दुर्गंधीयुक्त डब्यांपर्यंत विविध समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने स्वच्छतेच्या कामात काही त्रुटी राहण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, गणपतीसाठी कुटुंबासह कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असताना रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था करावी आणि प्रत्येक फेरीपूर्वी डब्यांची स्वच्छता सुनिश्चित करावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून होत आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

मंडणगड : आतकोळ फाट्यावर भरधाव कारची एसटी बसला जोरदार धडक; दोघे जखमी

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : नाचणे येथे बोटीवर विराजमान गणराया; ‘समुद्र सफर’ देखाव्याने वेधले भक्तांचे लक्ष

Gramin Varta
1 Min Read

नाटे बाजारपेठेतील टपरीत मटका जुगार; वृद्धावर पोलिसांची कारवाई, रोकड व साहित्य जप्त

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

2 Min Read
महाराष्ट्र

नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका

2 Min Read
महाराष्ट्र

महिला शेतकऱ्यांना अधिकृत सन्मान; राज्यभरात प्रमाणपत्र नोंदणी व वितरणाची धडक मोहीम सुरू, १७ ऑक्टोबरपर्यंत संधी

2 Min Read
महाराष्ट्र

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाची धुरा ‘गोल्ड मेडलिस्ट’ सीमा पाहूजा यांच्याकडे; सीबीआयकडून जुन्या कागदपत्रांची नव्याने झाडाझडती सुरू

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?