ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग : लांजा ज्येष्ठ महिलेच्या खून व जबरी चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग : लांजा ज्येष्ठ महिलेच्या खून व जबरी चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा
लांजा

ब्रेकिंग : लांजा ज्येष्ठ महिलेच्या खून व जबरी चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा

Gramin Varta
Last updated: October 20, 2026 12:47 pm
Gramin Varta
2.6k Views
Share

सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्धेचा जीव घेणाऱ्या कर्जबाजारी आरोपीला बेड्या

लांजा: लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेरवली रामगाव, लाडवाडी येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिला वैशाली विलास हेगिष्टे यांच्या निर्घृण खुनाचा आणि सोन्याचे दागिने जबरीने लुटल्याच्या गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत छडा लावला आहे. सोन्याच्या दागिन्यांची लूट करून दिशाभूल करण्यासाठी वृद्धेच्या हातात बनावट बांगड्या घालणाऱ्या आणि कर्जबाजारीपणामुळे हा भीषण गुन्हा करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

१९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान वैशाली हेगिष्टे या आपल्या घरी एकट्या असल्याची संधी साधून अज्ञात मारेकऱ्याने घरात प्रवेश केला. त्याने वैशाली यांचा निर्घृण खून करून त्यांच्या दोन्ही हातांतील सोन्याच्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेतल्या. चोरीचा संशय येऊ नये म्हणून आरोपीने जाताना त्यांच्या हातात नकली बांगड्या अडकवल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेनंतर लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३०९(४) व ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे वेगाने हलवली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची तीन स्वतंत्र तपास पथके तात्काळ रवाना करण्यात आली. गोपनीय माहिती, संशयितांची पडताळणी आणि सायबर-तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयाची सुई निश्चित केली. त्यानुसार घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर राहणारा संशयित प्रमोद खेडेकर याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला असता, डोक्यावर झालेल्या कर्जामुळेच आपण हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. या धडक कारवाईत पोलीस अधिकारी देवकन्या मैदाड, अमोद सरंगले, संदीप ओगले, प्रशांत बोरकर तसेच पोलीस अंमलदार सचिन भुजबळराव, नितेश राणे, प्रियांका कांबळे, प्रतीक्षा राणे, संजय मारळकर, विजय आंबेकर, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, भैरवनाथ सवाईराम, दत्ता कांबळे व अतुल कांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली असून, अवघ्या १२ तासांत खुनाची उकल करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitors :

5469360
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

हर्दखळे ग्रामपंचायतीकडून २१ RTI अर्जांची माहिती न मिळाल्याने किरण चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा; लांजा पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर : आशियाई पॅरा स्पर्धेत कोंडयेच्या प्रणव देसाईची ऐतिहासिक भरारी; ११.९६ सेकंदांत शर्यत जिंकून पटकावले कांस्यपदक

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत मांडवी भुते नाक्यावर रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव ॲक्टिव्हाची धडक; दुचाकीस्वार पसार

Gramin Varta
2 Min Read

बुद्धिबळाच्या पटावर साडवलीच्या आरुष चव्हाणची बाजी; १७ वर्षांखालील विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा:धुंदरे मावळतवाडीत ‘मिशन बंधारे’ उपक्रमांतर्गत बंधाऱ्याची उभारणी

1 Min Read
लांजा

लांजा येथे आज ‘स्वरबहार’ संगीतसंध्येचे आयोजन

1 Min Read
लांजा

लांजाच्या दिपराज-तीर्थाचा तायक्वॉंदोमध्ये दुहेरी सुवर्णवेध

2 Min Read
लांजा

अंजनारी घाटातील अपघात रोखण्यासाठी अखेर गतिरोधक उभारणीचे काम सुरू; ग्रामस्थांच्या अखंड पाठपुराव्याला यश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?