ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: बुद्धिबळाच्या पटावर साडवलीच्या आरुष चव्हाणची बाजी; १७ वर्षांखालील विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » बुद्धिबळाच्या पटावर साडवलीच्या आरुष चव्हाणची बाजी; १७ वर्षांखालील विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व
संगमेश्वर

बुद्धिबळाच्या पटावर साडवलीच्या आरुष चव्हाणची बाजी; १७ वर्षांखालील विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 8:27 am
Gramin Varta
7 Views
Share

देवरूख: रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल (साडवली) चा हुशार खेळाडू आरुष राजीव चव्हाण याने १७ वर्षांखालील वयोगटात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत थेट विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत धडक मारली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून या वयोगटात विभागीय फेरीसाठी पात्र ठरणारा आरुष हा एकमेव विद्यार्थी ठरल्याने तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात त्याचे विशेष कौतुक होत आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील निवडक विद्यार्थ्यांच्या सहभागाने रंगलेल्या या स्पर्धेत आरुषने संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना आपल्या चाणाक्ष डावपेचांनी संपूर्ण स्पर्धेवर छाप पाडली. आरुषच्या या यशाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याने कोणत्याही बुद्धिबळ वर्गात किंवा व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेत न जाता केवळ स्व-अभ्यास व ऑनलाईन बुद्धिबळाच्या साहाय्याने ही पूर्वतयारी केली होती. कोणतीही बाह्य शिकवणी नसताना केवळ स्वतःची दुर्दम्य जिद्द, सातत्यपूर्ण चिकाटी आणि खेळावरील निस्सीम आवडीच्या जोरावर त्याने मिळवलेले हे यश थक्क करणारे ठरले आहे.

याआधी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवून त्याने संगमेश्वर तालुक्याच्या संघात स्थान मिळवले होते. त्यानंतर जिल्हास्तरावरही विजयी घोडदौड कायम राखत त्याने आता विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान पटकावला आहे. आरुषच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेच्या वतीने त्याचे जाहीर अभिनंदन करण्यात आले आहे तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Total Visitors :

5428514
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण रेल्वे स्थानकावर होमगार्डच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा जीव वाचला; युवासेनेकडून रोहित चिले यांचा सन्मान

Gramin Varta
2 Min Read

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन २४ तास सज्ज; ‘सेवा संकल्प अभियाना’तून थेट जनतेपर्यंत शासकीय सेवा

Gramin Varta
3 Min Read

दुष्काळाचं संकट विचित्र; योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा – उद्धव ठाकरे

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार का बोलत नाहीत? गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांचा सवाल

1 Min Read
संगमेश्वर

नायरी गावात मोबाईल नेटवर्कचा पुरता बोजवारा; सेवा पूर्ववत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा

2 Min Read
संगमेश्वर

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान

1 Min Read
संगमेश्वर

पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?