ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: हर्दखळे ग्रामपंचायतीकडून २१ RTI अर्जांची माहिती न मिळाल्याने किरण चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा; लांजा पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » हर्दखळे ग्रामपंचायतीकडून २१ RTI अर्जांची माहिती न मिळाल्याने किरण चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा; लांजा पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष
लांजा

हर्दखळे ग्रामपंचायतीकडून २१ RTI अर्जांची माहिती न मिळाल्याने किरण चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा; लांजा पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 9:10 pm
Gramin Varta
218 Views
Share

लांजा: हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात दाखल केलेल्या तब्बल २१ ऑनलाइन माहिती अधिकार अर्जांवर कोणतीही माहिती न मिळाल्याने आणि वरिष्ठ स्तरावरून निर्देश देऊनही प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने, हर्दखळे येथील रहिवासी किरण दत्ताराम चव्हाण यांनी लांजा पंचायत समितीसमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दप्तर तपासणीची निश्चित वेळ व तारीख लेखी स्वरूपात न दिल्यास २६ ऑक्टोबर रोजी हे उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण चव्हाण यांनी मे २०२६ पासून माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत हर्दखळे ग्रामपंचायतीशी संबंधित विकासकामे, चौदावा वित्त आयोग, नवीन इमारत बांधकाम, नळ जोडणी यादी अशा विविध विषयांवर एकूण २१ ऑनलाइन अर्ज सादर केले होते. मात्र विहित मुदत उलटून गेल्यानंतरही ग्रामसेविका यांच्याकडून कोणतीही कायदेशीर माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. याप्रकरणी त्यांनी दाखल केलेल्या प्रथम अपीलावरही सुनावणी न झाल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारदार चव्हाण यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडे दाद मागितल्यानंतर, जिल्हा परिषद कार्यालयाने लांजा गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले होते. मात्र त्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने तक्रारदाराची कोणतीही दाद घेतली गेली नाही. यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणारे आंदोलन प्रशासनाच्या विनंतीवरून मागे घेण्यात आले होते, मात्र त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला ई-मेल व निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दप्तर तपासणी आणि कायदेशीर कार्यवाहीबाबत टाळाटाळ होत असल्याने, आता २४ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरला लांजा पंचायत समिती येथे शांततापूर्ण मार्गाने लाक्षणिक उपोषण छेडण्याचा पवित्रा तक्रारदाराने घेतला असून, यामुळे पंचायत समिती वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Total Visitors :

5469363
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल; रखडलेल्या प्रक्रियेमुळे वेतनावर टांगती तलवार

Gramin Varta
2 Min Read

राजापुरात चुलत्याला शिवीगाळ करत पुतण्याकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

Gramin Varta
2 Min Read

जाकादेवीत १४ नोव्हेंबरला हार्मोनियम, ढोलकी वादन प्रशिक्षण कार्यशाळा

Gramin Varta
1 Min Read

खेड : शिव बुद्रुक-भोईवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहणे काळाची गरज; लांजा येथे विधी सेवा प्राधिकरणातर्फे सायबर सुरक्षा प्रबोधन

2 Min Read
लांजा

लांजा बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास संशयितरीत्या फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कारवाई

1 Min Read
लांजा

लांजा येथील ७८ वर्षीय महिलेची ६० लाखांची सायबर फसवणूक; पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अटकेची धमकी

2 Min Read
लांजा

लांजा पोलिसांच्या आवाहनाला कुवेतील सिद्धिविनायक मंडळाची साथ; ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’च्या संकल्पाबद्दल पोलिसांकडून गौरव

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?