ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल; रखडलेल्या प्रक्रियेमुळे वेतनावर टांगती तलवार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल; रखडलेल्या प्रक्रियेमुळे वेतनावर टांगती तलवार
रत्नागिरी

शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल; रखडलेल्या प्रक्रियेमुळे वेतनावर टांगती तलवार

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 9:22 am
Gramin Varta
31 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या ई-केवायसी प्रक्रियेत राजापूर तालुक्याने अत्यंत निराशाजनक कामगिरी नोंदवली असून, सप्टेंबरअखेरपर्यंत एकाही शिक्षक अथवा केंद्रप्रमुखाचा प्रस्ताव पुढे न पाठवल्याने तालुक्याची प्रगती थेट शून्य टक्क्यांवर अडखळली आहे. याउलट मंडणगड तालुक्याने तब्बल ९३.५८ टक्के काम पूर्ण करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व तालुकाप्रमुख आणि मुख्याध्यापकांना लेखी पत्र पाठवून ही मोहीम तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले होते. तरीही संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ५ हजार ६३ प्राथमिक शिक्षक आणि २३७ केंद्रप्रमुख अशा एकूण ५ हजार ३०० कर्मचाऱ्यांपैकी संपूर्ण जिल्ह्याची सरासरी केवळ ६८.९८ टक्क्यांवरच थांबली आहे.

सद्यस्थितीतील अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील ४ हजार १६१ कर्मचाऱ्यांनी आपले प्रस्ताव सादर केले असून त्यातील ३ हजार ६५६ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, तर १७० प्रस्ताव त्रुटींमुळे बाद झाले असून ३३५ प्रस्ताव अजूनही तपासणीच्या पातळीवर प्रलंबित आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे १ हजार १३९ कर्मचाऱ्यांनी अद्याप प्रक्रियेला सुरुवातच न केल्याने जिल्ह्यात एकूण १ हजार ६४४ शिक्षकांची ई-केवायसी लटकलेली आहे. यात राजापूरमधील ६३५ शिक्षक आणि ३२ केंद्रप्रमुख अशा ६६७ जणांपैकी एकानेही प्रस्ताव सादर न केल्याने ही गंभीर उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातीलही ३५ केंद्रप्रमुखांपैकी एकानेही स्वतःची नोंदणी पुढे न पाठवल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांनीच नियमांकडे पाठ फिरवल्यास शिक्षकांकडून काय अपेक्षा ठेवायची, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास संबंधितांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखले जाणार असल्याचे संकेत असल्याने, आता शासन या मोहिमेला मुदतवाढ देऊन दिलासा देणार की वेतनावर थेट कारवाईचा बडगा उगारणार, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5469404
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

वणौशी तर्फ पंचनदी अणुऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध; प्रशासनाने कोणतीही कागदोपत्री कार्यवाही न करण्याची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी

Gramin Varta
2 Min Read

तिवरे येथे जलयुक्त शिवार योजनेतून तीन बंधाऱ्यांचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी तालुक्यात भूजल पातळी तब्बल २.९६ मीटरने घसरली; जिल्ह्यातील १८३ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावट

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांना दिवाळीपूर्वी थेट खात्यात मदत; शेतकऱ्यांना सरसकट दिलासा देणार : कृषी मंत्री

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

चवे बुद्धविहारात वर्षावास धम्म प्रवचनमालेचे १५ वे पुष्प संपन्न

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : हैदराबादच्या प्री-आरडी परेड शिबिरासाठी साईराज शिंदेची निवड

1 Min Read
रत्नागिरी

सणासुदीच्या काळात रास्त धान्य दुकानांतून साखर, तेल, मैद्याचा पुरवठा करा; ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

2 Min Read
रत्नागिरी

महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर कर; गणपतीपुळेच्या श्रींच्या चरणी भाविकांचे अंगारकीला साकडे

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?