ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चवे बुद्धविहारात वर्षावास धम्म प्रवचनमालेचे १५ वे पुष्प संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चवे बुद्धविहारात वर्षावास धम्म प्रवचनमालेचे १५ वे पुष्प संपन्न
रत्नागिरी

चवे बुद्धविहारात वर्षावास धम्म प्रवचनमालेचे १५ वे पुष्प संपन्न

Gramin Varta
Last updated: October 13, 2026 5:21 pm
Gramin Varta
99 Views
Share

माता रमाईंचे त्यागी जीवन समस्त महिलांसाठी दिशादर्शक – बौद्धाचार्य दीपक जाधव

तरवळ/ अमित जाधव: रत्नागिरी तालुक्यातील चवे येथील बुद्धविहारात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचनमालिकेतील १५ वे पुष्प रविवारी मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात गुंफण्यात आले. ग्रामशाखेचे अध्यक्ष प्रशांत अशोक यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात “माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व” या विषयावर विचार मांडताना प्रसिद्ध प्रवचनकार तथा माजी श्रामणेर बौद्धाचार्य दीपक जाधव यांनी माता रमाईंचा त्यागी व संघर्षमय जीवनप्रवास उलगडून दाखवला. बाबासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून संसारातील अतोनात हालअपेष्टा सोसणाऱ्या आणि सामाजिक समतेच्या लढ्यात अनमोल योगदान देणाऱ्या माता रमाईंचे जीवन समस्त भारतीय स्त्रियांसाठी चिरंतन प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर उपस्थितांनी त्रिसरण व पंचशीलाचे सामुदायिक ग्रहण केले. ग्रामशाखेचे सचिव अमित अनंत यादव यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले, तर तालुका शाखेचे संस्कार विभाग उपाध्यक्ष प्रीतम सावंत यांनी यशस्वी नियोजनाबद्दल स्थानिक शाखेचा सन्मान केला. यावेळी पाली विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वासनिक यांनी प्राचीन भारतीय संस्कृती व मूळ बुद्ध धम्म समजून घेण्यासाठी धम्मलिपी व पाली भाषेचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन केले. समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त तालुका संरक्षण विभाग उपाध्यक्ष राजेंद्र पवार यांनी तालुक्यातील अधिकाधिक युवक-युवतींना आगामी प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

या सोहळ्यात ग्रामशाखेतील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तालुका शाखेतर्फे गुलाबपुष्प देऊन विशेष गौरव करण्यात आला. तालुका प्रचार व पर्यटन विभागाचे सचिव अशोक यादव यांनीही मनोगत व्यक्त करत धम्माचरणाचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाला तालुका सचिव सिद्धार्थ जाधव, संरक्षण विभाग सचिव प्रमोद जाधव, प्रचार सचिव आदेश कांबळे, तालुका संघटक सुरेश जाधव, राहुल जाधव, ज्येष्ठ बौद्धाचार्य गौतम सावंत, अनिल जाधव, तानाजी कांबळे, महिला सैनिक शुभांगी कांबळे, रचना पवार यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, महिला मंडळ आणि उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणानंतर सरनंतय गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली आणि शेवटी ग्रामशाखेतर्फे उपस्थित भाविकांना भोजनदान देण्यात आले.

Total Visitors :

5468536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त २२ वर्षीय तरुणीचा दापोलीत उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत मांदिवलीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : ‘फर्टिलिटी टेस्ट ट्यूब सेंटर’च्या बॅटरी सेटअपमध्ये शॉर्ट सर्किट

Gramin Varta
1 Min Read

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांना दिवाळीपूर्वी थेट खात्यात मदत; शेतकऱ्यांना सरसकट दिलासा देणार : कृषी मंत्री

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वरूप नेनेची तबला वादनात बाजी

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक

2 Min Read
रत्नागिरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाची दुरवस्था; तोडफोडीच्या चौकशीसह सीसीटीव्ही आणि संरक्षक कठड्याची वंचितची मागणी

2 Min Read
रत्नागिरी

चाफेरी सहानवाडीत १५ वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमा व दीपोत्सवाची परंपरा कायम

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?