ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापुरात चुलत्याला शिवीगाळ करत पुतण्याकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापुरात चुलत्याला शिवीगाळ करत पुतण्याकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
राजापूर

राजापुरात चुलत्याला शिवीगाळ करत पुतण्याकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 4:54 pm
Gramin Varta
213 Views
Share

राजापूर  : राजापूर तालुक्यातील ओझर राबंडवाडी येथे रस्त्याने चालत जाणाऱ्या ७५ वर्षीय चुलत्याला अकारण शिवीगाळ करत पाठीमागून लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या पुतण्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अचानक झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध चुलते जखमी झाले असून, पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला आहे. राजेंद्र राजाराम वालम (वय ३७ वर्षे, रा. ओझर तांबळवाडी, ता. राजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पुतण्याचे नाव आहे.

या संदर्भात मूळचे ओझर तांबळवाडी येथील रहिवासी व सध्या अंधेरी (मुंबई) येथे वास्तव्यास असलेले झिमाजी हरी वालम (वय ७५) यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि संशयित आरोपी हे नात्याने चुलत काका-पुतणे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी झिमाजी वालम हे त्यांचे चुलत भाऊ दत्ताराम केशव वालम आणि शेजारी प्रदीप विठोबा मालपेकर यांच्या समवेत राबंडवाडीतील रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी समोरून येणारा पुतण्या राजेंद्र वालम याने फिर्यादींना पाहून अश्लील शब्दांत शिवीगाळ केली.

या शिवीगाळीचा जाब विचारत ‘कशाला शिवी देतोस?’ असे विचारले असता राजेंद्र तेथून काही न बोलता निघून गेला. मात्र, थोड्याच वेळात फिर्यादी काही अंतरावर पुढे जात असताना, राजेंद्रने मागून येऊन हातातील लाकडी दांडक्याने झिमाजी वालम यांच्या डाव्या बाजूला कंबरेवर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात वृद्ध झिमाजी वालम जबर जखमी झाले. घटनेनंतर त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी संशयित आरोपी राजेंद्र वालम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये दुखापत व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळग्रस्तांना दिलासा! शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शासन निर्णय जाहीर

Gramin Varta
2 Min Read

चार महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून स्वप्नील गेला; बापाच्या मायेसाठी लेकीची नजर भिरभिरतेय…

Gramin Varta
3 Min Read

नाटे बाजारपेठेतील टपरीत मटका जुगार; वृद्धावर पोलिसांची कारवाई, रोकड व साहित्य जप्त

Gramin Varta
1 Min Read

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

राजापूर

जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

2 Min Read
राजापूर

राजापूरच्या पाचल पूर्व विभागात भातशेती संकटात; पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल

1 Min Read
राजापूर

राजापूर : भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला समोरासमोर धडक; स्कुटीस्वार तरुण गंभीर जखमी

2 Min Read
राजापूर

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?