ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीची निवड चाचणी उत्साहात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीची निवड चाचणी उत्साहात
लांजा

लांजात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीची निवड चाचणी उत्साहात

Gramin Varta
Last updated: October 20, 2026 3:45 pm
Gramin Varta
265 Views
Share

लांजा/अरबाज नेवरेकर : महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निवड चाचणीला लांजात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लांजा येथील खानविलकर मैदानावर झालेल्या या निवड चाचणीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथील एकूण १२५ युवा खेळाडूंनी सहभाग घेतला.

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीगचे संस्थापक व अध्यक्ष तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ सोलकर फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लांजा येथील निवड चाचणीचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक बाळू साळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एकनाथ सोलकर फाउंडेशनचे संस्थापक ब्रिजेश सोलकर, भरत लोहार, दीपक पवार, भूपेंद्र सिन्हा, प्रवीण घेवारी, गणेश कामटे आदी उपस्थित होते. निवड चाचणीदरम्यान खेळाडूंच्या क्रिकेटमधील कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी मुंबईतील माजी क्रिकेटपटू उमेश मांजरेकर, कल्याणी घोरपडे, करुणा कोटियान, प्रशांत गावडे यांच्यासह रत्नागिरीतील दीपक मोरे, दिवाकर मयेकर, सईद मुकदम, गिरीश कोचरेकर, दिनेश माईन, सोनम चव्हाण आणि सुधा पवार उपस्थित होते.

या निवड चाचणीत सहभागी झालेल्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील आपली गुणवत्ता दाखवून दिली. उपस्थित क्रिकेटपटूंनी खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण करून त्यांच्या कौशल्याची पारख केली.

राज्यातील होतकरू आणि गुणवत्तावान टेनिस क्रिकेट खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी ९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत राज्यभरातील १५०० हून अधिक खेळाडूंनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्याचबरोबर निवड चाचणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी करण्यासाठीही खेळाडूंचा प्रतिसाद मिळत आहे.

यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि शिर्डी येथे विविध जिल्ह्यांतील खेळाडूंसाठी निवड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात २२ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे सोलापूर, सांगली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील खेळाडूंसाठी निवड चाचणी होणार आहे. त्यानंतर २४ व २५ ऑक्टोबर रोजी पुणे येथे पुणे व सातारा जिल्ह्यांसाठी, २८ व २९ ऑक्टोबर रोजी रायगड येथे, तर ३१ ऑक्टोबर रोजी पालघर येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

तसेच २ व ३ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी भिवंडी येथे आणि ४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील खेळाडूंसाठी विक्रोळी येथे निवड चाचणी होणार आहे.

महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी या निवड चाचण्या महत्त्वाची संधी ठरणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या क्रीडा कौशल्याला वाव द्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खापणे महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

Gramin Varta
1 Min Read

विद्यार्थी समाजविघातक नाहीत; विश्वास पुन्हा मिळवा – हायकोर्ट

Gramin Varta
3 Min Read

निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा वर्तक कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा

Gramin Varta
2 Min Read

चित्ररुपम स्टुडिओच्या कथा स्पर्धेत १५ कथांची अंतिम फेरीसाठी निवड; ग्रामीण व सामाजिक वास्तवाचे दर्शन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा तालुक्यात २०४३ गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप; भाविकांचे पाणावले डोळे, पोलिसांचा चोख बंदोबस्त

1 Min Read
लांजा

लांजा: धुंदरेत खुराड्यात शिरला ९ फुटी अजगर; सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका

1 Min Read
लांजा

वाढत्या ऑक्टोबर हिटमुळे लांज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची ठाकरे गटाची मागणी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर

2 Min Read
लांजा

आमदार किरण सामंत यांच्या आवाहनाला लांजात शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वेरळ येथे बंधारे बांधणी मोहिमेचा शुभारंभ

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?