ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वाढत्या ऑक्टोबर हिटमुळे लांज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची ठाकरे गटाची मागणी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वाढत्या ऑक्टोबर हिटमुळे लांज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची ठाकरे गटाची मागणी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर
लांजा

वाढत्या ऑक्टोबर हिटमुळे लांज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची ठाकरे गटाची मागणी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Gramin Varta
Last updated: October 9, 2026 5:09 pm
Gramin Varta
250 Views
Share

लांजा : तालुक्यात सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढू लागल्याने कडक उन्हाचा थेट फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या वेळेत तीव्र तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तालुक्यातील सर्व शाळा तात्पुरत्या स्वरूपात सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तालुकाप्रमुख युवराज हांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लांजा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सुपूर्द केले.

दुपारच्या कडक उन्हात शाळेत ये-जा करताना आणि वर्गात बसताना लहान मुलांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये डिहायड्रेशन, अशक्तपणा, चक्कर येणे तसेच उष्माघाताचा धोका संभवतो. या प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम मुलांच्या एकाग्रतेवर आणि एकूणच अध्ययन प्रक्रियेवर होत असल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. शैक्षणिक वेळापत्रकापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अधिक मोलाची असल्याने प्रशासनाने हवामान सुसह्य होईपर्यंत शाळा सकाळच्या वेळेत भरवण्याबाबत तात्काळ आदेश जारी करावेत, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पालक व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने विनाविलंब सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

निवेदन सादर करतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज हांदे यांच्यासह शहरप्रमुख मोहन तोडकरी, विभागप्रमुख विश्वास मांडवकर, उपशहरप्रमुख बाबू गुरव, उपविभागप्रमुख अल्लादिन नेवरेकर, राजेंद्र सुर्वे, शांताराम गुरव, महेंद्र पाल्ये आणि शिवसैनिक बेर्डे सर उपस्थित होते. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनाही पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण : वालोपे येथून प्रौढ बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीकरांनी दिला लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; ३६ हजार १७५ घरगुती तर ७२ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन

Gramin Varta
1 Min Read

पाणीपट्टीवरून मुरादपूरच्या सरपंचांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; मंडणगड पोलिसांत गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

बजाज पल्सर एनएस ४००झेड अद्ययावत आवृत्ती लाँच; नवीन टीएफटी डिस्प्लेचा समावेश

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

लांजा

वैशाली हेगिष्ट्ये हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी ग्रामस्थांचे सामूहिक निवेदन

4 Min Read
लांजा

किरणोदय फाउंडेशनतर्फे लांजात १७ ऑक्टोबरला महिलांसाठी भव्य दांडिया गरबा रास सोहळा!

3 Min Read
लांजा

पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली

2 Min Read
लांजा

‘मिशन पोलीस पाटील’ व ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत लांजात पोलीस अधीक्षकांकडून मार्गदर्शन; कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर भर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?