ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: साटवलीतील मुस्लिमवाडी, बौद्धवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » साटवलीतील मुस्लिमवाडी, बौद्धवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!
लांजा

साटवलीतील मुस्लिमवाडी, बौद्धवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 11:26 am
Gramin Varta
312 Views
Share

लांजा (अरबाज नेवरेकर): तालुक्यातील साटवली गावातील मुस्लिमवाडी आणि बौद्धवाडी परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिक ग्रामस्थांसह शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा तसेच रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

साटवलीतील मुस्लिमवाडी आणि बौद्धवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली निदर्शनास येत आहेत. विशेषतः दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तसेच रात्रीच्या वेळी बिबट्या मुख्य रस्त्यावर फिरताना दिसत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे नागरिक, शेतकरी आणि दुचाकीस्वारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडतानाही नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेळीवर बिबट्याने भरदिवसा हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हल्ल्यानंतर बिबट्याने शेळीला जंगलाच्या दिशेने ओढून नेल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, जनावरांना चरण्यासाठी बाहेर घेऊन जाणेही धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या परिसरातील अनेक नागरिक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. मात्र, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतात जाणे, जनावरांसाठी चारा आणणे तसेच दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडताना नागरिकांना भीतीचा सामना करावा लागत आहे. मानवी वस्तीलगतच बिबट्याचा वावर सुरू असल्याने ग्रामस्थांनी विशेष चिंता व्यक्त केली आहे.

या प्रकाराची माहिती लांजा तालुका वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने संबंधित परिसराची तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करावे, जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येईल, अशी मागणी साटवलीतील मुस्लिमवाडी, बौद्धवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता साटवली परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5468468
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोली: माटवण येथे म्हशी चरायला घेऊन गेलेल्या गुराख्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : कोकणनगर येथे रेशन धान्याचे सुरळीत वितरण; ९८ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले धान्य

Gramin Varta
1 Min Read

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

अंजणारीतील मृत्यूचा सापळा हटवा, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडणार; माजी खासदार विनायक राऊत यांचा महामार्ग विभागाला सज्जड इशारा

2 Min Read
लांजा

एकल महिलांच्या सर्वेक्षणाला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

1 Min Read
लांजा

पाककलेचा समृद्ध वारसा! लांजातील ज्ञानेश्वरी वाघधरेने अवघ्या काही तासांत साकारला बाप्पासाठी ४२ नैवेद्यांचा थाट

2 Min Read
लांजा

दोन दशकांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या निवसर बागवाडीतील पुनर्वसनग्रस्तांच्या अडचणींना अखेर पूर्णविराम; किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?