ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर : ओणी येथे आईसोबत शेतात गेलेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा चक्कर येऊन उपचारादरम्यान मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर : ओणी येथे आईसोबत शेतात गेलेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा चक्कर येऊन उपचारादरम्यान मृत्यू
राजापूर

राजापूर : ओणी येथे आईसोबत शेतात गेलेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा चक्कर येऊन उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
Last updated: November 6, 2026 10:14 am
Gramin Varta
289 Views
Share

राजापूर : तालुक्यातील ओणी माळीवाडी येथे शेतात आईसोबत गेलेल्या एका १२ वर्षीय शाळकरी बालिकेचा अचानक चक्कर येऊन पडल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. भातकापणीच्या कामादरम्यान खेळत असताना हा प्रकार घडला. या घटनेमुळे ओणी परिसरासह संपूर्ण राजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ओणी माळीवाडी येथील रहिवासी असलेले दीपक जानू गितये यांची पत्नी देवयानी या गुरुवारी आपल्या दोन मुलांसह म्हणजे मुलगी गौरी आणि मुलगा जयेश यांना सोबत घेऊन शेतात भातकापणीच्या कामासाठी गेल्या होत्या. शेतामध्ये देवयानी या भातकापणीचे काम करत असताना गौरी (वय १२ वर्षे) आणि तिचा भाऊ जयेश हे जवळच शेतात खेळत होते. खेळता खेळता सायंकाळच्या सुमारास अचानक गौरीला भोवळ आली आणि ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली.

​मुलगी अचानक खाली पडल्याचे लक्षात येताच आईने तातडीने आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने तिला सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास तात्काळ ओणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले तरी उपचारादरम्यान सायंकाळी पावणेसात वाजता तिची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गौरी हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ऐन दिवाळी-कापणीच्या दिवसांत खेळत्या-हसत्या १२ वर्षीय चिमुरडीचा असा अचानक डोळ्यादेखत अंत झाल्याने गितये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

​या प्रकरणी मयत मुलीचे वडील दीपक जानू गितये यांनी दिलेल्या माहितीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ७०/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468458
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख-तेलीवाडी व भोरपवणे येथे कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर उतरून नोंदवले नुकसानीचे पंचनामे

Gramin Varta
2 Min Read

श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव आणि वसुंधरा वारीचे आयोजन

Gramin Varta
1 Min Read

गुहागर: काजळी येथे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात

Gramin Varta
2 Min Read

मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचाराचा भडका; दोघांची हत्या

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

राजापूर

बलशाली लोकशाहीसाठी तरुणाईची नवमतदार नोंदणी गरजेची : संजय पवार

3 Min Read
राजापूर

पाचल परिसरात पावसाची संततधार; उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान

1 Min Read
राजापूर

राजापुर: कोदवली धरण सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र;आठवडा बाजारावर सायंकाळी ७ चे बंधन

2 Min Read
राजापूर

राजापूर: नाणार खाडी दुर्घटनेने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; तीन चिमुरड्यांचा दफनविधी, चौथ्या मुलीचा शोध सुरूच

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?