ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी: खेडशी येथील २० वर्षीय तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी: खेडशी येथील २० वर्षीय तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी

रत्नागिरी: खेडशी येथील २० वर्षीय तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 24, 2026 1:31 pm
Gramin Varta
237 Views
Share

रत्नागिरी: तालुक्यातील खेडशी, एकतानगर येथून २० वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाला असून अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या तरुणाचा कसून शोध घेत आहेत.

साहिल संतोष गुरव (वय २० वर्षे, रा. एकतानगर, महालक्ष्मी मंदिराजवळ, खेडशी, मूळ रा. प्रभानवल्ली-गुरववाडी, ता. लांजा) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. साहिल हा दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरातून कोणासही काही न सांगता निघून गेला होता. तो बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूचा परिसर, नातेवाईक आणि मित्रांकडे त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.

अखेर अज्ञात व्यक्तीने साहिलचे अपहरण करून त्याला पळवून नेल्याची खात्री पटल्याने त्याचे वडील संतोष बाळकृष्ण गुरव (वय ४५, व्यवसाय ड्रायव्हिंग) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या तरुणाचा ठावठिकाणा लावण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे पथक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करत आहे.

Total Visitors :

5468412
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जमीन मोजणीनंतर आता नकाशा तात्काळ ऑनलाइन मिळणार; कोकण उपसंचालक अनिल माने यांची माहिती

Gramin Varta
2 Min Read

श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी पडवण-लांजा एसटी बसफेरी सुरू

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात जांभा दगडांनी भरलेल्या १२ चाकी ट्रकचा भीषण अपघात

Gramin Varta
2 Min Read

मनोज जरांगेंनी ५०० कोटींचा आरोप सिद्ध करून दाखवावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आव्हान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी आरपीएफची कौतुकास्पद कामगिरी : राजधानी एक्सप्रेसमध्ये विसरलेला ७० हजारांचा आयफोन प्रवाशाला परत

1 Min Read
रत्नागिरी

भावे आडोम येथे विहिरीत बुडून प्रौढाचा मृत्यू; मजगावच्या धाडसी तरुणांनी विहिरीत उतरून बाहेर काढला मृतदेह

3 Min Read
रत्नागिरी

राजवीर पोवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; हरचिरीच्या मल्लाची लाल मातीत चमकदार कामगिरी

1 Min Read
रत्नागिरी

कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?