ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात जांभा दगडांनी भरलेल्या १२ चाकी ट्रकचा भीषण अपघात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात जांभा दगडांनी भरलेल्या १२ चाकी ट्रकचा भीषण अपघात
खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात जांभा दगडांनी भरलेल्या १२ चाकी ट्रकचा भीषण अपघात

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 7:31 am
Gramin Varta
160 Views
Share

खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कुख्यात भोस्ते घाटात ब्रेक निकामी झाल्याने जांभा दगड वाहून नेणाऱ्या एका १२ चाकी अवजड ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा थरारक अपघात रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जांभा दगडांची वाहतूक करणारा भारत बेंझ कंपनीचा ‘एमएच ०८ एपी २७३६’ क्रमांकाचा अवजड बारा चाकी ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. हा ट्रक भोस्ते घाटातील ‘ब्लाइंड स्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीव्र उताराच्या आणि धोकादायक वळणावर आला असता अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. नियंत्रणाबाहेर गेलेला हा अवजड ट्रक प्रथम महामार्गाच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर जोराने आदळला आणि त्यानंतर थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकला.

अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील प्रवाशांचे लक्ष तातडीने तिकडे वेधले गेले. या जोरदार धडकेत ट्रकच्या पुढील भागासह वाहनाचे अतोनात नुकसान झाले आहे, मात्र दैव बलवत्तर म्हणून चालक आणि इतर कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. भोस्ते घाटातील धोकादायक वळणे आणि तीव्र उतारावर अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होण्याच्या घटना वारंवार समोर येत असल्याने, या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी वाहनांची तपासणी करून विशेष दक्षता बाळगणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Total Visitors :

5468425
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

मिरजोळे येथे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला मेळावा संपन्न; आरोग्य तपासणीसह पौष्टिक आहार प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
1 Min Read

ऐन दुष्काळी संकटात पशुपालकांना मोठा दिलासा; राज्यात प्रथमच ‘महाराष्ट्र वैरण विकास धोरण’ लागू

Gramin Varta
2 Min Read

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

खेड

Apple Pay Celebrates Milestone: Surpasses X Billion Transactions Mark

7 Min Read
खेड

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी व वाढदिवस साजरा न करण्याचा ॲड. वैभव खेडेकर यांचा निर्णय

2 Min Read
खेड

खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा; तिघांना बेड्या, स्विफ्ट कार जप्त

1 Min Read
खेड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेनिमित्त खेडमध्ये ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?