ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी व वाढदिवस साजरा न करण्याचा ॲड. वैभव खेडेकर यांचा निर्णय
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी व वाढदिवस साजरा न करण्याचा ॲड. वैभव खेडेकर यांचा निर्णय
खेड

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी व वाढदिवस साजरा न करण्याचा ॲड. वैभव खेडेकर यांचा निर्णय

Gramin Varta
Last updated: November 3, 2026 4:12 pm
Gramin Varta
65 Views
Share

वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यात उभारणार २५ वनराई बंधारे

खेड  : यंदा राज्यावर दुष्काळाचे मोठे सावट असून बळीराजा गंभीर आर्थिक व नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला आहे. सण-उत्सवांवर होणारा वायफळ खर्च टाळून तो संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे.

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत २९ नोव्हेंबर रोजी येणारा आपला वाढदिवसही कोणत्याही स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय ॲड. खेडेकर यांनी घेतला आहे. खेड तालुक्यात आगामी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत पाणीटंचाईची तीव्र समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य संकटाची आगाऊ दखल घेत वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात दुष्काळ निवारणाचा ठोस उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या अंतर्गत खेड तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये स्वखर्चाने २५ वनराई बंधारे उभारण्यात येणार असून, गरजू गावांमध्ये तातडीने ही कामे हाती घेतली जाणार आहेत.

या लोककल्याणकारी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जलपातळी वाढण्यास मदत होईल आणि भविष्यातील पाणीप्रश्न काही प्रमाणात हलका होण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने सर्व नागरिक, राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्याचे नेतृत्व करत असलेल्या दुष्काळ निवारण मोहिमेला लोकसहभागाची जोड दिल्यास या नैसर्गिक संकटावर प्रभावीपणे मात करता येईल, असेही त्यांनी नमूद केले. यंदाची दिवाळी आणि वाढदिवस हा जल्लोष म्हणून नव्हे, तर समाजसेवेचे पर्व म्हणून साजरा करत बळीराजाला थेट दिलासा देण्याचा हा संवेदनशील प्रयत्न सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी समर्पित असल्याचे ॲड. खेडेकर यांनी स्पष्ट केले असून, त्यांच्या या निर्णयाचे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात स्वागत होत आहे.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

आंबा घाट उद्यापासून अवजड वाहतुकीसाठी खुला करा, अन्यथा अडथळे मोडून वाहने नेऊ; आमदार किरण सामंत यांचा प्रशासनाला सज्जड इशारा

Gramin Varta
2 Min Read

मिरकरवाडा बंदरातील मोडकळीस आलेल्या विनावापर नौका हटवण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत एसटीच्या ताफ्यात १०४ नव्या बसेस दाखल; दोन महिन्यांत ४७ ‘ई-शिवाई’ धावणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Gramin Varta
2 Min Read

जळगावात स्टेट बँकेवर भरदिवसा थरारक दरोडा; गोळीबार करत २७ किलो सोने व रोख रकमेसह पळ काढणारे चौघे गजाआड, बडतर्फ पीएसआयने तुरुंगातूनच रचला होता कट

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

खेड

लोटे एमआयडीसीतील एम.आर. स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत भीषण आग; लाखो रुपयांची वित्तहानी, वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांत संताप

1 Min Read
खेड

खेड नगरपरिषदेच्या वतीने ‘सावित्रीबाई शहर वस्तीस्तर महिला बचत गट’ वस्तू प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शानदार शुभारंभ

2 Min Read
खेड

खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा; तिघांना बेड्या, स्विफ्ट कार जप्त

1 Min Read
खेड

खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?