ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: भावे आडोम येथे विहिरीत बुडून प्रौढाचा मृत्यू; मजगावच्या धाडसी तरुणांनी विहिरीत उतरून बाहेर काढला मृतदेह
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » भावे आडोम येथे विहिरीत बुडून प्रौढाचा मृत्यू; मजगावच्या धाडसी तरुणांनी विहिरीत उतरून बाहेर काढला मृतदेह
रत्नागिरी

भावे आडोम येथे विहिरीत बुडून प्रौढाचा मृत्यू; मजगावच्या धाडसी तरुणांनी विहिरीत उतरून बाहेर काढला मृतदेह

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 9:55 am
Gramin Varta
720 Views
Share

रत्नागिरी : तालुक्यातील भावे आडोम गावडे गोरीवलेवाडी परिसरातील भुताचे कातळ येथे विहिरीच्या पाण्यात बुडून ४७ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. संतोष दादू आंबेकर (वय ४७, रा. भावे आडोम गावडे गोरीवलेवाडी, रत्नागिरी) असे मृत इसमाचे नाव असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यास कोणीही पुढे येत नसताना माजी सरपंचांच्या संपर्कानंतर मजगाव येथील तरुणांनी दाखवलेल्या धाडसामुळे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास संकेत संजय कारकर हे भुताचे कातळ येथील एका विहिरीवरून जात असताना त्यांना काठावर चप्पल आणि लाकडी काठी बेवारस स्थितीत दिसली. विहिरीत कोणीतरी पडल्याचा संशय आल्याने त्यांनी पात्रात डोकावून पाहिले असता एका व्यक्तीचे शव पाण्यावर तरंगताना दिसले. संकेत यांनी तत्काळ वाडीतील ग्रामस्थांना बोलावून घेतले. पाण्यातील कपड्यांवरून ग्रामस्थांना हे शव गावातील संतोष आंबेकर यांचे असावे असा अंदाज आला. त्यानंतर त्यांचे सुपुत्र दुर्वेश संतोष आंबेकर यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. विहिरीबाहेरील चप्पल, काठी आणि पाण्यातील कपड्यांवरून दुर्वेश यांनी ते शव आपल्या वडिलांचेच असल्याची खात्री केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पाटील माने यांनी तात्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र, विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीवर कुणीही विहिरीत उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे दांडे आडोमचे माजी सरपंच कैलास तांबे यांनी तातडीने मजगावचे माजी सरपंच फैयाज मुकादम यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. फैयाज मुकादम यांच्या सूचनेवरून मजगाव येथील आपत्कालीन मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे हरीश पोमेटकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तोपर्यंत ग्रामीण पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. माहिती मिळताच मजगाव येथील हरीश पोमेटकर, गफूर काझी आणि झियान मुकादम यांनी क्षणाचाही विलंब न लावता, आपल्या जीवाची पर्वा न करता थेट घटनास्थळी धाव घेतली. हरीश पोमेटकर आणि गफूर काझी हे दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरले, तर झियान मुकादम याने त्यांना विहिरीबाहेरून मोलाची मदत केली. या तिघांनी शर्थीचे प्रयत्न करून संतोष आंबेकर यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.

नेहमीच विहिरीत पडलेली मुकी जनावरे सुखरूप बाहेर काढणे, लोकवस्तीत शिरलेले विषारी सर्प पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडणे यांसारखी सामाजिक कामे विनामूल्य करणाऱ्या मजगावच्या या तिन्ही धाडसी तरुणांचे पोलीस प्रशासन, माजी सरपंच आणि दांडे आडोम ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले असून परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संतोष आंबेकर यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बीएनएसएस १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ९६/२०२६ अशी नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468407
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Gramin Varta
1 Min Read

ओल्ड मॉन्कच्या विक्रीचा मार्ग मोकळा होणार? कंपनीचा महत्त्वाचा निर्णय; नव्या लेबलसह पुन्हा FSSAI कडे धाव

Gramin Varta
2 Min Read

उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा संगमेश्वरवासीयांतर्फे जाहीर सत्कार

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर : कुळ्ये येथील नवलाई मंदिरात चोरी; दानपेटी फोडून रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास, देवरुख पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीच्या कर्तव्यदक्ष डीवायएसपी आरंक्षा यादव यांची लातूर येथे बदली

1 Min Read
रत्नागिरी

व्हॉट्सॲप पोस्टचा राग मनात धरून कंपनीत घुसून दिव्यांग कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; जैतापूरच्या चौघांवर गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांची आरोग्य सेवेत उपसंचालक पदावर पदोन्नती

1 Min Read
रत्नागिरी

राजस्थान रॉयल्सचे रोमी भिंडर आणि आलोक चित्रे उद्या रत्नागिरीत

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?