ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर : कुळ्ये येथील नवलाई मंदिरात चोरी; दानपेटी फोडून रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास, देवरुख पोलिसांत गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर : कुळ्ये येथील नवलाई मंदिरात चोरी; दानपेटी फोडून रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास, देवरुख पोलिसांत गुन्हा दाखल
संगमेश्वर

संगमेश्वर : कुळ्ये येथील नवलाई मंदिरात चोरी; दानपेटी फोडून रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास, देवरुख पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 15, 2026 10:46 am
Gramin Varta
169 Views
Share

देवरुख (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील कुळ्ये-साळवीवाडी येथील नवीन नवलाई मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने डल्ला मारत गाभाऱ्याबाहेरील स्टीलची दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर आणि हार्डडिस्क पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३४(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली होती. चोरट्याने मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या स्टीलच्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील अंदाजे दोन हजार रुपयांची रोकड लंपास केली; तसेच आपली ओळख पटू नये यासाठी मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची सुमारे साडेसात हजार रुपये किमतीची जुनी वापरती डीव्हीआर व हार्डडिस्कही चोरून नेली. या चोरीत एकूण ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.

सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कुळ्ये गावच्या मुंबई मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गावी आल्यानंतर या घडलेल्या चोरीच्या प्रकाराबाबत ग्रामस्थांच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मूळचे कुळ्ये साळवीवाडी येथील रहिवासी व सध्या संगम सोसायटी, रूम नं. ६१२, सिद्धीविनायक मंदिरासमोर, भटवाडी, घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे वास्तव्यास असलेले अनिल राजाराम साळवी (वय ६४) यांनी बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली. ग्रामस्थांच्या चर्चेअंती विलंबाने दिलेल्या या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर क्र. १५८/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून, देवरुख पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ठाण्यात ठाकरेसेनेच्या शाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

Gramin Varta
2 Min Read

जलसंपदा विभाग आणि राधाकृष्ण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा; दिवाळवाडीत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा जागर

Gramin Varta
2 Min Read

साखरतर येथून कामावर गेलेल्या २७ वर्षीय तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

कांद्याच्या साली फेकू नका! कुंडीतील झाडांसाठी ठरतात नैसर्गिक खत; वापरण्याच्या चार सोप्या पद्धती

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

युवासेना संगमेश्वर तालुका आयोजित ‘मखर सजावट स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न; प्रज्वल शिगवण ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

2 Min Read
संगमेश्वर

उपकेंद्र दाभोळे येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव कृती दल समितीची बैठक संपन्न

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवानिमित्त कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा गौरव

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?