ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कोकणातल्या ‘या’ गावात माणसांसाठी नव्हे तर चक्क गिधाडांसाठी गेल्या २४ वर्षांपासून डीजेला बंदी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कोकणातल्या ‘या’ गावात माणसांसाठी नव्हे तर चक्क गिधाडांसाठी गेल्या २४ वर्षांपासून डीजेला बंदी
कोकण

कोकणातल्या ‘या’ गावात माणसांसाठी नव्हे तर चक्क गिधाडांसाठी गेल्या २४ वर्षांपासून डीजेला बंदी

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 8:52 pm
Gramin Varta
60 Views
Share

म्हसळा (विशेष प्रतिनिधी) : लग्नसमारंभ म्हटला की डीजे, बँजो आणि मोठ्या आवाजातील संगीत हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील चिरगाव याला अपवाद ठरले आहे. येथे लग्नकार्य असो किंवा धार्मिक उत्सव, डीजे आणि बँजोला ग्रामस्थांनी चक्क हद्दपार केले आहे. या निर्णयामागे कोणतीही अंधश्रद्धा नसून, झाडांवर घरटी करून राहणाऱ्या दुर्मिळ गिधाडांच्या संरक्षणाची संवेदनशील भूमिका आहे. त्यामुळेच चिरगाव परिसरातील बागेची वाडी आज ‘गिधाडांचे गाव’ म्हणून विशेष ओळख निर्माण करत आहे.

निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गिधाडांची संख्या देशभरात मोठ्या प्रमाणात घटत असताना चिरगावमधील ग्रामस्थांनी या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी तब्बल दोन दशकांहून अधिक काळ आपली परंपरा आणि उत्सवांची पद्धत बदलून ठेवली आहे. बागेच्या वाडीतील घरांच्या मागील अंगणातील झाडांवर सुमारे ५० ते ६० गिधाडांनी आपला अधिवास निर्माण केला आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ असूनही या गिधाडांना सुरक्षित वातावरण मिळत असल्याने हा परिसर त्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरला आहे.

महाराष्ट्रात गिधाडांच्या चार प्रजातींचा कायमस्वरूपी अधिवास असून तीन प्रजाती स्थलांतर करून येतात. चिरगाव परिसरात दुर्मिळ मानली जाणारी पांढऱ्या पुठ्याची गिधाडे आणि लांब चोचीची गिधाडे आढळतात. लांब चोचीची गिधाडे कड्या-कपाऱ्यांमध्ये घरटी करत असल्याने ती परिसरात प्रामुख्याने विसाव्यासाठी येतात, तर पांढऱ्या पुठ्याची गिधाडे बागेच्या वाडीला लागून असलेल्या सुमारे ४३ हेक्टर राखीव वनक्षेत्रातील उंच झाडांवर नियमितपणे घरटी बांधून राहतात.

गिधाडांच्या विणीचा हंगाम आणि पिल्लांच्या संगोपनाचा काळ लक्षात घेऊन ग्रामस्थांनी २००२ मध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. गावातील लग्नकार्य असो किंवा धार्मिक उत्सव, डीजे अथवा बँजो पार्टी गावात आणायची नाही, असा सर्वसंमतीचा नियम करण्यात आला. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ग्रामस्थ या नियमाचे काटेकोरपणे पालन करत आहेत. मोठ्या आवाजामुळे आणि ध्वनीच्या तीव्र कंपनांमुळे गिधाडे घाबरू नयेत, पिल्ले घरट्यांमधून खाली पडू नयेत आणि त्यांच्या अधिवासाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

विशेष म्हणजे, या संवर्धन मोहिमेची नाळ केवळ गावात राहणाऱ्या ग्रामस्थांशी जोडलेली नाही. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांमध्ये उदरनिर्वाहासाठी गेलेले चाकरमानीदेखील गावातील या गिधाडांशी भावनिकरित्या जोडले गेले आहेत. गावी परतल्यानंतर झाडांवरील गिधाडांची घरटी सुरक्षित आहेत का, याची आस्थेने पाहणी केली जाते. ‘आमचे गिधाड’ या आपुलकीच्या शब्दांत ग्रामस्थ या पक्ष्यांकडे पाहतात.

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या अनेक घटना समोर येत असताना चिरगावने मात्र सहजीवनाचा वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. स्वतःच्या उत्सवांवर काही मर्यादा घालत ग्रामस्थांनी दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बागेची वाडी केवळ गिधाडांचा अधिवास राहिलेली नसून, सामूहिक इच्छाशक्ती, निसर्गप्रेम आणि वन्यजीव संवर्धनाची जिवंत प्रयोगशाळा ठरली आहे. गिधाडांसाठी गावकऱ्यांनी स्वीकारलेली ही शांतता आज त्यांच्या संवर्धनासाठी आशेचा आवाज ठरत आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांची परीक्षा; रेल्वे गाड्या ११ ते १२ तास उशिराने, प्रवाशांचा संताप

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळाचं संकट विचित्र; योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा – उद्धव ठाकरे

Gramin Varta
4 Min Read

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

Gramin Varta
2 Min Read

खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

कोकण

हवामान बदल आणि वाढत्या खर्चाने मच्छीमार संकटात; उत्पादनात वाढ होऊनही आर्थिक कोंडी कायम, ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

2 Min Read
कोकण

मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांनंतरही रखडलेलाच; खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर

4 Min Read
कोकण

रायगड- भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

1 Min Read
कोकण

कोकणच्या किनारपट्टी विकासाला राज्य सरकारचे बळ; बंदरे आणि पोहोच रस्त्यांसाठी १७० कोटींचा निधी मंजूर, सागरी वाहतूक गतिमान होणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?