ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: नाणारमध्ये भरदिवसा घरफोडी करून १२ हजारांचे चांदीचे दागिने लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » नाणारमध्ये भरदिवसा घरफोडी करून १२ हजारांचे चांदीचे दागिने लंपास
राजापूर

नाणारमध्ये भरदिवसा घरफोडी करून १२ हजारांचे चांदीचे दागिने लंपास

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 11:21 am
Gramin Varta
105 Views
Share

राजापूर : तालुक्यातील नाणार-भटवाडी येथे अज्ञात चोरट्याने दिवसा घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे १२ हजार रुपये किमतीचे चांदीचे साहित्य चोरून नेल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लता वासुदेव साईम (वय ६५, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. नाणार-भटवाडी, ता. राजापूर) यांच्या राहत्या घरी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडी झाली. अज्ञात आरोपीने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन्ही बेडरुममधील कपाटे उचकटून त्यातील मौल्यवान वस्तूंची तपासणी करण्यात आली.

चोरट्याने घरातून सुमारे ४ हजार ५०० रुपये किमतीचे एक वाटी असलेले चांदीचे हळदी-कुंकवाचे भांडे तसेच सुमारे ७ हजार ५०० रुपये किमतीचे गोल आकाराचे चांदीचे निरंजन असा एकूण १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाटे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा क्रमांक १०३/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५(अ) तसेच संबंधित जुन्या भारतीय दंड संहितेतील कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीमागील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दागिन्यांसाठी केला मावशीचा खून; ४० दिवसांनी भाच्याच्या कृत्याचा पर्दाफाश

Gramin Varta
3 Min Read

टाटा एरिस सेडान भारतात लाँच

Gramin Varta
2 Min Read

लांजा बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास संशयितरीत्या फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कारवाई

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी-सिंधुदुर्गात ९,५०० कोटींचा ग्रीन स्टील प्रकल्प; ४ हजार रोजगारांची निर्मिती

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

राजापूर

10 Tech Innovations Set to Reshape the World As We Know It

7 Min Read
राजापूर

राजापूर: नाटे येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

1 Min Read
राजापूर

कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच गणेश वरेकर यांची बिनविरोध निवड

1 Min Read
राजापूर

राजापूर : शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहावर शिक्षकांना मार्गदर्शन; हरळ येथे केंद्रस्तरीय परिषद संपन्न

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?