ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी-सिंधुदुर्गात ९,५०० कोटींचा ग्रीन स्टील प्रकल्प; ४ हजार रोजगारांची निर्मिती
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी-सिंधुदुर्गात ९,५०० कोटींचा ग्रीन स्टील प्रकल्प; ४ हजार रोजगारांची निर्मिती
रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्गात ९,५०० कोटींचा ग्रीन स्टील प्रकल्प; ४ हजार रोजगारांची निर्मिती

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 8:29 am
Gramin Varta
31 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग परिसरात ग्रीन स्टील उत्पादनाचा मोठा प्रकल्प उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पुढे पडली आहेत. AIIFA चे संचालक योगेश मंधानी यांनी सुमारे ७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावावर चर्चा केली असून, प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतील एकूण गुंतवणूक सुमारे ९,५०० कोटी रुपये होणार आहे.या प्रकल्पामुळे कोकणातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्यासोबतच ३,००० ते ४,००० रोजगार निर्माण होणार आहेत.

ग्रीन स्टील प्रकल्पासाठी हरित वीज आवश्यक असून, कंपनीने प्रति युनिट ३ रुपये दराने हरित वीज उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. पर्यावरणपूरक उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रकल्पाची उभारणी दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ०.५ MTPA क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २०० एकर जमीन आवश्यक आहे. या टप्प्यात सुमारे ३,००० ते ४,००० रोजगार निर्माण होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रकल्पाची क्षमता १.२ MTPA पर्यंत वाढविण्यात येणार असून, त्यासाठी आणखी सुमारे ३०० एकर जमीन आवश्यक असेल. अशा प्रकारे संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ५०० एकर जमीन लागणार असून, एकूण गुंतवणूक सुमारे ९,५०० कोटी रुपये असेल.

प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता कंपनीकडून प्रमाणित करून आवश्यक तांत्रिक टिपण सादर करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाला पूरक सहाय्यक परिसंस्था निर्माण करण्यासाठी Circular Economy Park विकसित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचेही ठरले आहे.

प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या पाहणीसाठी पुढील आठवड्यात जमीन पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कंपनीकडून DPR (Detailed Project Report) सादर करण्यात येईल आणि त्यानंतर Letter of Intent (LoI) देण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी MIDC जमीन पाहणीचा समन्वय करणार आहे.

कोकणाच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना

या प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ग्रीन स्टीलसारखा आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रकल्प उभा राहणे ही कोकणाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मोठ्या गुंतवणुकीसोबतच स्थानिक पातळीवर हजारो रोजगार निर्माण होणार असल्याने त्याचा थेट फायदा कोकणातील तरुणांना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला होईल. या प्रकल्पामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणाच्या विकासाला मोठी चालना मिळेल.”

“महाराष्ट्रात पर्यावरणपूरक आणि भविष्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. कोकणात मोठी गुंतवणूक यावी, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित व्हावी, यासाठी शासन सकारात्मक आहे,” असे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे उद्योगाभिमुख जिल्हे म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अशा मोठ्या गुंतवणुकीसाठी अतिरिक्त प्रोत्साहनांचा विचार करण्यात येणार आहे.

ग्रीन स्टील प्रकल्पासोबत Circular Economy आधारित औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याचा प्रस्ताव असल्याने या प्रकल्पाचा परिणाम केवळ एका उद्योगापुरता मर्यादित राहणार नाही. या प्रकल्पामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणाच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Total Visitors :

5427529
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी २.० पोर्टल तातडीने सुरू करा

Gramin Varta
2 Min Read

खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत ७० वर्षीय महिला घरातून बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

Gramin Varta
1 Min Read

काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू, चौघे जखमी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण

2 Min Read
रत्नागिरी

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

2 Min Read
रत्नागिरी

दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग

3 Min Read
रत्नागिरी

आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?