ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सिद्धार्थ महाविद्यालयाची कार्ले-भाजे लेणी अभ्यास सहल उत्साहात संपन्न; ६० वर्षांवरील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचाही दुर्गम पायऱ्या सर करत ऐतिहासिक लेण्यांमध्ये प्रवेश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सिद्धार्थ महाविद्यालयाची कार्ले-भाजे लेणी अभ्यास सहल उत्साहात संपन्न; ६० वर्षांवरील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचाही दुर्गम पायऱ्या सर करत ऐतिहासिक लेण्यांमध्ये प्रवेश
महाराष्ट्र

सिद्धार्थ महाविद्यालयाची कार्ले-भाजे लेणी अभ्यास सहल उत्साहात संपन्न; ६० वर्षांवरील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचाही दुर्गम पायऱ्या सर करत ऐतिहासिक लेण्यांमध्ये प्रवेश

Gramin Varta
Last updated: October 9, 2026 11:55 am
Gramin Varta
67 Views
Share

मुंबई: मुंबई येथील सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या पाली विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक कार्ले व भाजे लेणी एक दिवसीय अभ्यास सहल मोठ्या उत्साहात पार पडली. या अभ्यास सहलीचे प्रमुख आकर्षण ठरले ते पाली भाषेचा अभ्यास करणारे ६० वर्षांवरील ज्येष्ठ विद्यार्थी; ज्यांनी प्रचंड उत्साह दाखवत तब्बल ३०० ते ४०० पायऱ्या सहज पार करून लेण्यांमध्ये प्रवेश केला. या उपक्रमात सहलीचे प्रमुख प्रा. विनोद भेले, प्रा. विजय मोहिते, आशा उके मॅडम तसेच पाली भाषा विभाग प्रमुख व अभ्यासक प्रा. दिलीप वासनिक (भारतीय बौद्ध महासभा, रत्नागिरी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अभ्यास सहलीमध्ये मुंबईतून ५० विद्यार्थी सहभागी झाले होते, तर रत्नागिरीतून आयु. प्रकाश कांबळे, अरुणकुमार मोरे, सुहास कांबळे, तानाजी कांबळे, अशोक जाधव आणि आदेश कांबळे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लेण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम चैत्यगृह स्तूपाला वंदन करून रतन सुत्ताचे पठण करण्यात आले. यानंतर प्राध्यापक भेले यांनी विद्यार्थ्यांना कार्ले व भाजे लेण्यांचा सविस्तर इतिहास उलगडून दाखवला. कार्ले लेणीचे प्राचीन नाव ‘वारीला लेण’ असून ही लेणी साधारणपणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील सातवाहन काळातील आहे. लोणावळ्यापासून अवघ्या चार किलोमीटरवर वसलेल्या या लेणीतील चैत्यस्तूपाची रचना, मेदी, वेदिका, अर्धगोलाकार अंड, हर्मिका, यष्टी, तोरण, स्तंभांवरील शिलालेख आणि छताला आधार देणाऱ्या लाकडी कमानींची ऐतिहासिक वैशिष्ट्ये त्यांनी विशद केली.

तसेच बाजूलाच असलेल्या अत्यंत प्राचीन भाजे लेणीविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, इ.स. पूर्व दुसऱ्या ते पहिल्या शतकातील ही लेणी थेरवाद बौद्ध परंपरेतील असून येथे २२ लेण्यांचा समूह, चैत्यगृह आणि भिक्खूंसाठी विहार आहेत. या ठिकाणी १४ स्तूपांचा समूह आणि विहार क्रमांक १९ मधील सूर्य व इंद्राची शिल्पे हे बौद्ध स्थापत्यकलेचे अद्वितीय नमुने आहेत. या अभ्यास सहलीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्राचीन इतिहास आणि बौद्ध स्थापत्यकलेचा समृद्ध वारसा अनुभवण्याची उत्तम संधी मिळाली.

Total Visitors :

5468573
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सुप्रीम कोर्टाने फेटाळली शाळांमध्ये दररोज संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याची मागणी करणारी याचिका

Gramin Varta
2 Min Read

जागतिक अन्न दिनानिमित्त शिरगावच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये पाककला स्पर्धा संपन्न

Gramin Varta
3 Min Read

अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन गोदामातून अ‍ॅल्युमिनिअम पत्रे व लोखंडी पाईप लंपास; एकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण: खेर्डी एमआयडीसीत संशयास्पदरीत्या फिरणारा तरुण तांब्याच्या तारांसह अटकेत

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

3 Min Read
महाराष्ट्र

अरबी समुद्रात ३ हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त; ५ पाकिस्तानी नागरिक ताब्यात

2 Min Read
महाराष्ट्र

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

4 Min Read
महाराष्ट्र

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय; निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

5 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?