ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
महाराष्ट्र

अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 8:21 am
Gramin Varta
12 Views
Share

मुंबई: राज्यात अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद यांसारखी पिके पावसाअभावी करपून गेली असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधन मोठ्या संकटात सापडले आहे. या संदर्भात पाठवलेल्या पत्रात एकूण 9 मागण्यांचा समावेश आहे.

प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे :

1) राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा. गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांना तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करून दुष्काळी सवलती लागू करण्यात याव्यात.

2) शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये मदत जाहीर करावी. तसेच, शेतमजूर कुटुंबांना देखील प्रत्येकी 25,000 रु. विशेष मदत देण्यात यावी.

3) आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची तातडीने अंमलबजावणी करून तत्काळ पीककर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान 50 हजारांवरून 1 लाख रुपये करण्यात यावे. तसेच, 2025-26 मध्ये पीककर्ज घेऊन यंदा थकीत झालेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा.

4) एक रुपयात पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून शेतकरी हिताचे पूर्वी वगळलेले सर्व ट्रिगर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण द्यावे. तसेच, गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर करण्यात आलेली हेक्टरी 17 हजार रुपयांची पीकविमा मदतही तत्काळ वितरित करावी.

5) दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विशेष योजना राबवत शेतीसंबंधित, जलसंधारण संबंधित तसेच इतर कामे करून घ्यावीत. फळबागा वाचवण्यासाठी देखील टँकर व्यवस्था सुरू करण्यात यावी.

6) पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांचे तत्काळ सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार शासकीय टँकर सुरू करावेत. तसेच, या सर्व भागात मागणीनुसार तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात. पशुधनासाठी पिण्याचे पाणी आणि आवश्यक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात.

7) दुष्काळात लोड शेडिंगच्या समस्या वाढत असल्याने विद्युत रोहित्र दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी ऊर्जाविभागाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात यावी.

8) प्रत्येक जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि पशुधनाची स्थिती यावर दररोज देखरेख ठेवण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष सुरू करावेत.

9) दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये दुष्काळ सवलतींमध्ये केवळ परीक्षा शुल्क माफ न करता, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.

शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि ग्रामीण जनजीवनावर निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, वरील मागण्यांवर मुख्यमंत्री महोदय सकारात्मक निर्णय घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करतील, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Probing the Frontiers of Understanding and Treating Brain Disorders

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

Gramin Varta
1 Min Read

World Independently and Embracing the Freedom of Solo Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

शाळेतून पत्नीला घेऊन परतताना काळाचा घाला;उभ्या पिकअपला दुचाकीची धडक, लेकीसह बापाचा अंत

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड; ‘चेन ऑफ कस्टडी’वरील सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण, ३० सप्टेंबरला पुढील सुनावणी

2 Min Read
महाराष्ट्र

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

2 Min Read
महाराष्ट्र

नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका

2 Min Read
महाराष्ट्र

बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता, SBI कडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?