ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील धोकादायक स्थिती; सात ठिकाणी रस्ता खचला, कोट्यवधींच्या कामाची काही महिन्यांतच चाळण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील धोकादायक स्थिती; सात ठिकाणी रस्ता खचला, कोट्यवधींच्या कामाची काही महिन्यांतच चाळण
महाराष्ट्र

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील धोकादायक स्थिती; सात ठिकाणी रस्ता खचला, कोट्यवधींच्या कामाची काही महिन्यांतच चाळण

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 4:52 pm
Gramin Varta
289 Views
Share

कोल्हापूर / श्रीकृष्ण भोसले: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटातील रस्त्याची सध्या अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी खचलेला रस्ता, पडलेल्या भेगा, कोसळलेल्या दरडी आणि दरीत ढासळलेल्या संरक्षक भिंतींमुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. चौपदरीकरणाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असतानाही अवघ्या काही महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, सद्या गणपतीजवळ, गोकवेवाडी, दाभोळे यासह आंबा घाटातील तब्बल सात ठिकाणी रस्ता खचल्याची स्थिती असून, अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीही कोसळल्या आहेत.

आंबा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या महामार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, घाटातील अरुंद रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता खचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. काही ठिकाणी एकेरी वाहतूक करावी लागत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः घाटातील वळणावर सुमारे ३० मीटर लांबीची संरक्षक भिंत दरीत कोसळल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

महामार्गावरील पडलेल्या भेगा आणि खचलेल्या भागांवर डांबर व खडी टाकून तात्पुरती डागडुजी केली जात आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यानंतर ही मलमपट्टी वाहून जात असून पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे आणि भेगा निर्माण होत आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या कामाच्या टिकाऊपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव असून, आवश्यक संरक्षक कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे.

आंबा घाटातील दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटनांमागे डोंगर उत्खनन आणि नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहांकडे झालेल्या दुर्लक्षाचाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. डोंगर उतारांवरील पाण्याचा नैसर्गिक निचरा योग्य पद्धतीने न झाल्यास मातीची धूप वाढून रस्ता खचण्याबरोबरच दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे केवळ वरवरची डागडुजी न करता घाटातील संपूर्ण रस्त्याचे आणि संरक्षक यंत्रणेचे तांत्रिक पद्धतीने परीक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

महामार्गाच्या कामाचा दर्जा, संरक्षक भिंतींची मजबुती आणि रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी आणि वाहनचालकांकडून होत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता खचलेल्या रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती, मजबूत संरक्षक भिंती, संरक्षक कठडे आणि आवश्यक दिशादर्शक फलक तातडीने उभारणे गरजेचे आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

Total Visitors :

5469385
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

फणसोप येथे बौद्धजन पंचायत समितीच्या वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न

Gramin Varta
4 Min Read

कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करा; राजापूरमधील कंत्राटदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Gramin Varta
2 Min Read

लांजा भाजीमार्केट परिसरात सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९२ हजार ४१० रुपयांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार १२ हजार रुपये

2 Min Read
महाराष्ट्र

दसरा, दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा; मुंबईसह महाराष्ट्रातून धावणार तब्बल ४१८ विशेष गाड्या

3 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ; ३५ टक्के पंचनामे पूर्ण

2 Min Read
महाराष्ट्र

गाणे बदलण्यावरून भिवंडीतील हॉटेलमध्ये दोन गटांत तुफान राडा; गोळीबार अन् चॉपरने हल्ला, ११ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?