ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ; ३५ टक्के पंचनामे पूर्ण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ; ३५ टक्के पंचनामे पूर्ण
महाराष्ट्र

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ; ३५ टक्के पंचनामे पूर्ण

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 8:33 am
Gramin Varta
40 Views
Share

नुकसानग्रस्त क्षेत्र व मदतीसाठी आवश्यक निधीची माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश

मुंबई : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत.

आतापर्यंत सुमारे ३५ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त क्षेत्राची अंतिम माहिती आणि शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या अंदाजे निधीचा तपशील शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या नियमानुसार दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये दोन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत दिली जाते. त्यानुसार कोरडवाहू किंवा जिरायत पिकांसाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी १७ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिके किंवा फळबागांसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत निश्चित करण्यात आली आहे.मागील वर्षी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत दिली होती. त्यामुळे यंदाही मदतीची मर्यादा दोन की तीन हेक्टर राहणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी दुष्काळामुळे बाधित झालेल्या दोन तसेच तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राचे पंचनामे करीत आहेत. पंचनाम्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती संकलित केली जात आहे.

काही भागांत दुष्काळाची तीव्रता अधिक

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासनाकडून विशेष निर्णय होण्याची शक्यता कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारपर्यंत नुकसानग्रस्त क्षेत्राची अंतिम आकडेवारी आणि आवश्यक निधीचा अंदाज समोर आल्यानंतर दुष्काळी मदतीचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पंचनाम्यांच्या अंतिम अहवालाकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5468443
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत ‘ऑक्टोबर हिट’चा तीव्र तडाखा; तापमान ३९.२ अंशांवर पोहोचल्याने विजेची मागणी थेट १८० मेगावॉटवर

Gramin Varta
3 Min Read

गणेश विसर्जनाहून परतलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; जुवे येथे सार्वजनिक विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

दापोली: माटवण येथे म्हशी चरायला घेऊन गेलेल्या गुराख्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर सप्तलिंगी येथे कारचा भीषण अपघात; डोंबिवलीचे दोन तरुण गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

‘दुःखी कसं राहायचं?’ केतनच्या मृत्यूनंतर सियाचा ChatGPTला सवाल; चार्जशीटमधील उल्लेखाने खळबळ

3 Min Read
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी दिलासा; ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २४ सप्टेंबरनंतर बँक खात्यात जमा होण्याची शक्यता

2 Min Read
महाराष्ट्र

रत्नागिरीसह कोकणात राज्य सरकार स्वतःची बंदरे उभारणार; जयगडमध्ये जहाजबांधणी केंद्र, १० हजार कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज

2 Min Read
महाराष्ट्र

कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर इमारतीत भीषण आग; पाच वर्षांच्या चिमुरड्यासह नऊ रहिवासी जखमी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?