ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर: कळसवलीत मध्यरात्री शिकारीसाठी फिरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर: कळसवलीत मध्यरात्री शिकारीसाठी फिरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
राजापूर

राजापूर: कळसवलीत मध्यरात्री शिकारीसाठी फिरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 7:38 pm
Gramin Varta
1.2k Views
Share

विनापरवाना गावठी ठासणीची बंदूक, टॉर्च आणि बोलेरो पिकअपसह २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

राजापूर/ तुषार पाचलकर: तालुक्यातील कळसवली परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या बोलेरो पिकअपमधून फिरणाऱ्या तिघांना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय असलेल्या या तिघांकडून विनापरवाना गावठी ठासणीची बंदूक, टॉर्च आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण २ लाख १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ऑल आऊट ऑपरेशनअंतर्गत गस्त सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.

अमित कृष्णा बाणे, योगेश नारायण बाणे (दोघेही रा. कळसवली) आणि विजय काशिनाथ तरळ (रा. तरळवाडी, कळसवली) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांसह शुक्रवारी रात्री ओणी आणि कळसवली परिसरात नियमित गस्त घालत होत्या. यावेळी मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान कळसवली येथे बोलेरो पिकअपमधून फिरणारे तिघे पोलिसांच्या नजरेस पडले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. या तपासणीत त्यांच्याकडे सिंगल नळीची जुनी गावठी ठासणीची बंदूक आणि शिकारीसाठी वापरले जाणारे टॉर्च आढळून आले.

बंदूक बाळगण्यासाठी आवश्यक असलेला परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान बंदूक, टॉर्च आणि बोलेरो पिकअप असा एकूण २ लाख १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचारी नितीन घोगले यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र कायद्यातील कलम ३/२५(१)(क) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील यांच्यासह सागर खंडागळे, नितीन घोगले, दीपक काळे, शिवणकर, जाधव, उकारडे आणि नरूटे या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

राजापूर शहर आणि तालुक्यात रात्रीच्या वेळी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ऑल आऊट ऑपरेशनअंतर्गत गस्त वाढविण्यात आली आहे. कळसवली येथील या कारवाईमुळे विनापरवाना शस्त्र बाळगण्याच्या प्रकारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर निर्बंध आणा; सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण सूचना

Gramin Varta
2 Min Read

देवळे येथे नसरे परिवाराची पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट; बांबू आणि गवतातून साकारले शेतकरी-निसर्गाचे अतूट नाते

Gramin Varta
1 Min Read

एशियन क्रीडा स्पर्धा: सुजित कलकलने ६५ किलो फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकले सुवर्णपदक

Gramin Varta
2 Min Read

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी 6 वर्षांनी गुन्हा दाखल; सामूहिक अत्याचार, हत्येसह कटाचे कलम

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

राजापूर

Exploring Intelligent Solutions for a Smart Approach to Skincare

7 Min Read
राजापूर

राजापुरात चुलत्याला शिवीगाळ करत पुतण्याकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

2 Min Read
राजापूर

राजापूर : भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला समोरासमोर धडक; स्कुटीस्वार तरुण गंभीर जखमी

2 Min Read
राजापूर

विद्यार्थ्यांनी स्मार्ट मोबाईलप्रमाणे अष्टपैलू व स्मार्ट बनावे; पाचल येथे राजेंद्र बहाळकर यांचे प्रतिपादन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?