ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दोन तोळे सोन्याच्या हावेपायी माणुसकी वेशीवर टांगली! सासरच्यांच्या पैशांच्या हव्यासाने सिझेरियन रोखले; ९ महिन्यांच्या स्वातीसह उदरातील निष्पापाचा तडफडून अंत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दोन तोळे सोन्याच्या हावेपायी माणुसकी वेशीवर टांगली! सासरच्यांच्या पैशांच्या हव्यासाने सिझेरियन रोखले; ९ महिन्यांच्या स्वातीसह उदरातील निष्पापाचा तडफडून अंत
महाराष्ट्र

दोन तोळे सोन्याच्या हावेपायी माणुसकी वेशीवर टांगली! सासरच्यांच्या पैशांच्या हव्यासाने सिझेरियन रोखले; ९ महिन्यांच्या स्वातीसह उदरातील निष्पापाचा तडफडून अंत

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 8:59 am
Gramin Varta
318 Views
Share

छत्रपती संभाजीनगर : माहेरहून अवघे दोन तोळे सोने आणण्याच्या क्षुल्लक मागणीसाठी गरोदरपणातही अमानुष शारीरिक व मानसिक छळ करत, प्रसूतीचा खर्च टाळण्यासाठी वैद्यकीय उपचार नाकारल्याने एका ९ महिन्यांच्या गर्भवती मातेचा आणि तिच्या पोटातील निष्पाप बाळाचा उपचाराअभावी अत्यंत करुण अंत झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील समीक्षा उर्फ स्वाती विशाल निंबाळकर (वय २६) असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या मृत्यूनंतर संतप्त भावना व्यक्त होत आहेत. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती गरोदर असताना ६ सप्टेंबर रोजी प्रकृती खालावल्यामुळे तिला एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तपासणीदरम्यान तिच्या पोटातील पाण्याचे प्रमाण धोकादायकरित्या कमी झाल्याचे आणि बाळाच्या गळ्याभोवती नाळ वेढली गेल्याचे निष्पन्न झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी स्वाती व बाळाचा जीव वाचवण्यासाठी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, पैशांच्या लोभापायी सासरच्या मंडळींनी उपचाराचा खर्च करण्यास स्पष्ट नकार देत क्रौर्याची परिसीमा गाठली. गरोदर असतानाही वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळवून देता संगनमताने हेतूपुरस्सर निष्काळजीपणा केला गेला, ज्यामुळे स्वातीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जाऊन अत्यंत चिंताजनक बनली.

अखेर परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी रात्री ११:१० वाजेच्या सुमारास तिला अत्यंत गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, क्रूर सासरच्यांच्या हलगर्जीपणामुळे तोपर्यंत बराच उशीर झाला होता; घाटी रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यापूर्वीच स्वाती आणि तिच्या गर्भातील निष्पाप जिवाची प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेनंतर स्वातीचे वडील सदाशिव शंकर देशमुख (वय ४९, रा. राहेरी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) यांनी पाचोड पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल रंगनाथ निंबाळकर, सासू शारदा अनिल निंबाळकर (सर्व रा. विहामांडवा, ता. पैठण) आणि नणंद ऐश्वर्या यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या अमानुष प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

इंडी आघाडीच्या बैठकीत एसआयआर, ईव्हीएम आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यावर सहमती

Gramin Varta
6 Min Read

गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरीत वाहन बाजारात कोट्यवधींची उलाढाल; आठ दिवसांत ७०१ नव्या वाहनांची खरेदी

Gramin Varta
2 Min Read

रायगड- भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

राजापूर : नाटे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, तीन घरफोडीचे गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात

1 Min Read
महाराष्ट्र

दिवेआगर समुद्र दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या लोककलेचा तेजस्वी तारा निखळला; ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

2 Min Read
महाराष्ट्र

२०३७ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट; २०२७ पासून जुन्या बसेसचे होणार ई-बसमध्ये रूपांतर : मंत्री प्रताप सरनाईक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?