ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राज्यातील महामार्ग उभारणीसाठी ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेचा वापर होणार; महानिर्मिती व MSRDC मध्ये महत्त्वाचा करार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राज्यातील महामार्ग उभारणीसाठी ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेचा वापर होणार; महानिर्मिती व MSRDC मध्ये महत्त्वाचा करार
महाराष्ट्र

राज्यातील महामार्ग उभारणीसाठी ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेचा वापर होणार; महानिर्मिती व MSRDC मध्ये महत्त्वाचा करार

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 11:25 am
Gramin Varta
60 Views
Share

मुंबई: औष्णिक विद्युत केंद्रांमधून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा शाश्वत फेरवापर करून पर्यावरण संवर्धनाला बळ देण्यासह राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी महानिर्मिती आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यात ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला. या करारानुसार जानेवारी २०२७ ते डिसेंबर २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीत पूर्व महाराष्ट्रातील नियोजित द्रुतगती मार्ग आणि खनिज वाहतूक मार्गांच्या उभारणीसाठी तब्बल ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेचा प्रत्यक्ष वापर केला जाणार आहे. मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. आणि एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार बी. गायकवाड यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक डॉ. नितीन वाघ आणि मुख्य महाव्यवस्थापक नरेंद्र टोके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या ऐतिहासिक करारामुळे महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये साचून राहिलेली राख महामार्ग निर्मितीच्या कामी येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्गासाठी सर्वाधिक २.७९ कोटी मेट्रिक टन, नागपूर-गोंदिया मार्गासाठी २.०९ कोटी मेट्रिक टन, भंडारा-गडचिरोली मार्गासाठी १.१४ कोटी मेट्रिक टन तर नवेगाव मोरे-सुरजागड खनिज वाहतूक मार्गासाठी ०.१५ कोटी मेट्रिक टन राखेचा पुरवठा केला जाईल. स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार नागपूर लगतच्या कामांसाठी कोराडी व खापरखेडा येथून, तर चंद्रपूर भागातील कामांसाठी चंद्रपूर केंद्रातून ही राख उपलब्ध करून दिली जाणार असून प्रत्यक्ष कामाच्या गरजेनुसार या प्रमाणात बदल होऊ शकतो.

राखेची वाहतूक, स्थळ उपलब्धता आणि आर्थिक तरतुदी सुरळीत पार पाडण्यासाठी औष्णिक केंद्र, एमएसआरडीसी आणि संबंधित कंत्राटदार यांच्यात स्वतंत्र त्रिपक्षीय करार करण्यात येणार असून मोजमाप व वापराच्या पडताळणीनंतरच आर्थिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. केंद्र सरकारच्या २०२१ च्या राख अधिसूचनेनुसार १०० टक्के राख वापराचे उद्दिष्ट गाठणे तसेच राज्य शासनाच्या सप्टेंबर २०२५ मधील राख धोरणाची अंमलबजावणी करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. ३१ मार्च २०३२ पर्यंत किंवा कामे पूर्ण होईपर्यंत वैध राहणाऱ्या या उपक्रमामुळे वर्षानुवर्षे साचलेल्या राखेच्या साठवणुकीची पर्यावरणीय व तांत्रिक जोखीम कमी होण्याबरोबरच रस्ते विकासाला नवा शाश्वत आयाम मिळणार आहे.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधण्याचे सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन

Gramin Varta
3 Min Read

गणेशोत्सवानंतरही रत्नागिरी पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम ठप्प; उर्वरित टपऱ्यांवर कारवाई कधी? नागरिकांचा सवाल

Gramin Varta
2 Min Read

वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार

Gramin Varta
2 Min Read

माध्यमिक विद्यालय वरवडे व श्रीम. पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त बळीराजाला दिवाळीची भेट; ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५ हजारांची मदत जमा

1 Min Read
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांना दिलासा! शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शासन निर्णय जाहीर

2 Min Read
महाराष्ट्र

एमबीबीएस व बीडीएस प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर; ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना संधी, १४ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे सीईटी कक्षाचे निर्देश

2 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये ८.५७ लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक; २.९१ लाख रोजगारांची संधी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?