ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार
रत्नागिरी

वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 9:23 am
Gramin Varta
26 Views
Share

रत्नागिरी : गेल्या पाच-सहा वर्षांपासून तीव्र विरोध आणि संभ्रमाच्या भोवऱ्यात अडकलेल्या वाटद एमआयडीसी तसेच प्रस्तावित डिफेन्स क्लस्टरच्या तिढ्यावर अखेर तोडगा निघण्याचे संकेत मिळाले आहेत. एमआयडीसी विरोधी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांसोबत झालेल्या अत्यंत सकारात्मक चर्चेनंतर, स्थानिकांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही देत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डिफेन्स क्लस्टरचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या घरांवरील सरकारी नोंदी तात्काळ हटवण्याचे तसेच वहिवाटीच्या दाव्यांवर कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्याचे थेट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली.

या बैठकीस आमदार किरण सामंत, प्रख्यात विधीज्ञ ॲड. असीम सरोदे, प्रांताधिकारी यांच्यासह संघर्ष समितीचे प्रतिनिधी प्रथमेश गवाणकर, संतोष बारगुडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. वाटद एमआयडीसीच्या स्थापनेपासूनच या प्रकल्पावरून स्थानिक पातळीवर दोन परस्परविरोधी गट निर्माण झाले होते. मात्र, राज्याचा उद्योगमंत्री म्हणून संघर्ष समितीसोबत अत्यंत सलोख्याच्या व कौटुंबिक वातावरणात सविस्तर चर्चा घडवून आणल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान कृती समितीने डिफेन्स क्लस्टरचा फेरविचार करणे, घरांवरील नोंदी रद्द करणे आणि वहिवाटीच्या दाव्यांचे निपक्षपातीपणे सातबारे देणे या तीन प्रमुख मागण्या लावून धरल्या होत्या. या मागण्यांवर सकारात्मक पावले टाकत, पुढील मार्ग काढण्यासाठी अनंत चतुर्दशीनंतर येत्या २८ किंवा २९ तारखेला प्रांताधिकारी आणि कृती समितीची विशेष संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

प्रस्तावित १००० एकरच्या डिफेन्स क्लस्टरमुळे जर स्थानिक जनतेला नाहक त्रास होणार असेल, तर त्याबाबत सविस्तर व गोपनीय अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हा अहवाल हाती आल्यानंतर वस्तुस्थिती तपासून क्लस्टरबाबत ठोस पुनर्विचार केला जाईल, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर ग्रामस्थांचे रोजगार, शेतजमिनी आणि कातळ जमिनींचे योग्य दर या सर्व घटकांमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी यासाठी प्रत्येक गावात जाऊन थेट संवाद बैठका घेण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. एमआयडीसीचा अध्यक्ष आणि उद्योगमंत्री म्हणून आपण स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या हिताला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Total Visitors :

5427502
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे कर्करोगाने निधन; तीन दशकांची गाजलेली अभिनय कारकीर्द संपुष्टात

Gramin Varta
2 Min Read

Local Traditions and Customs in Your Travel Adventures

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

रिचार्जमध्ये ‘डेटा’चा भार कमी होणार आता फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण रेल्वे स्थानकावर होमगार्डच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा जीव वाचला; युवासेनेकडून रोहित चिले यांचा सन्मान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

‘सेवा संकल्प अभियाना’ने तीन वर्षांच्या चिमुरडीला दिले नवे आयुष्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

2 Min Read
रत्नागिरी

थिबापॅलेस परिसरात मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात

2 Min Read
रत्नागिरी

भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उत्स्फूर्त सहभाग

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?