ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिवसेनेत प्रवेश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र

ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिवसेनेत प्रवेश

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 8:35 am
Gramin Varta
80 Views
Share

मुंबई: ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ठाण्यात पार पडलेल्या या पक्ष सोहळ्यावेळी शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस राहुल कनाल आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले की गेली अनेक वर्ष दुबे यांना शिवसेनेते काम करताना पाहिले आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडणाऱ्या या कार्यकर्त्याने आज मूळ शिवसेनेत प्रवेश केला. आनंद दुबे यांच्यासह गुलाबचंद मौर्य, सुनील चौबे, ब्रीजेश मोर्य, दशरत प्रजापती, प्रवीण दुबे, धनंजय गुप्ता यांच्यासह अनेकांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

ते पुढे म्हणाले की, अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या, पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण केले. महाराष्ट्राला अडीच वर्षात पुढे नेण्याचे काम केले. महाराष्ट्राला विकासाकडे आणि प्रगतीकडे घेऊन गेलो. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप सहकार्य लाभले. या सर्व कार्यकाळात आम्ही महाराष्ट्राला प्रगतीपथाकडे घेऊन गेलो. आज महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे, असे ते म्हणाले. या कामावर प्रभावित होऊन विविध पक्षातील लोक आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, दुबे यांना शिवसेनेच्या कार्यपद्धती माहित आहे. राहुल कनाल दुबे यांच्या कायम संपर्कात होते. दुबे यांनी योग्य पक्षात प्रवेश केला आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दुबे यांनी राष्ट्र प्रथमची भूमिका घेतली. हीच भूमिका बाळासाहेबांची होती आणि आज मोदीजींची सुद्धा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राष्ट्रीय स्तरावर शिवसेना विविध राज्यांमध्ये काम करत आहे. उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या विस्तारासाठी आनंद दुबे आणि त्यांची टीम काम करेल, असे ते म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार विजयी होतील

विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सचिन सानप हा मूळचा शिवसेनेचा आहे. पुणे शिक्षक मतदार संघात सचिन सानप याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तिथं महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल. इतर चारही ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढवतोय आणि काम करतोय. विधान परिषद निवडणुकीत पाचही ठिकाणी महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधकांकडून संविधानिक संस्थांवर प्रहार करण्याचे काम

विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत आंदोलन करतात. या आंदोलकांमागे परकीय शक्तींचा हात किंवा सहभाग दिसतो. विरोधकांना देशात अशांतता पसरवायची आहे. अराजकता पसरवायची आहे. ते नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेचे उदाहरण देतात हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानिक संस्थांचा अपमान करण्याचे काम विरोधी पक्ष नेते राहुल गांधी करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. हातात संविधानाचे पुस्तक घेऊन राहुल गांधी संविधानविरोधी काम करत आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयावर या व्यवस्थांवर ते प्रहार करत आहेत. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मात्र देशातील १४० कोटी जनता विरोधकांच्या फेक नरेटिव्हला फसणार नाहीत. काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहिल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे इथली जनता पूर्ण होऊ देणार नाही. राहुल गांधी यांनी देश तोडण्याची भाषा करणे हे दुर्देवी आहे. त्यांनी देश जोडण्याची भाषा करावी. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचे काम राहुल गांधी आणि इंडि आघाडीने केले त्याला कोर्टाने फटकारले, असे ते म्हणाले.

Total Visitors :

5468545
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजाच्या मृण्मयी साळवीची ‘कोण होणार करोडपती’मध्ये दमदार कामगिरी; ५ लाखांची कमाई

Gramin Varta
1 Min Read

सुप्रीम कोर्टाने फेटाळली शाळांमध्ये दररोज संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याची मागणी करणारी याचिका

Gramin Varta
2 Min Read

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय टप्प्याटप्प्याने लागू

Gramin Varta
2 Min Read

सीजेपीचे तरुणांना शांततापूर्ण आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढणार; ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पारा ३९ अंशांवर जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज

2 Min Read
महाराष्ट्र

नीट पेपरफुटी प्रकरण: लातूरच्या मोटेगावकर कुटुंबाला जबर धक्का; आदित्य मोटेगावकरवर दोन वर्षांची कडक बंदी

2 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार

2 Min Read
महाराष्ट्र

कामगार हक्कांच्या लढ्याला सन्मान; अनिल जाधव यांना ‘सह्याद्री जीवनगौरव पुरस्कार’

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?