ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार
महाराष्ट्र

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 9:14 am
Gramin Varta
7 Views
Share

मुंबई: राज्यातील नद्यांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान’ राबविण्यात येईल. अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे आयोजित संमेलनातून लवकरच करण्यात येणार आहे.

या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असून आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक येथे विशेष राज्यस्तरीय कार्यशाळा तसेच कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे.

मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नदी पुनरुज्जीवनबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस डॉ. राजेंद्र सिंह, सचिव एकनाथ डवले, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सचिव (लाभक्षेत्र विकास) प्रकाश मिसाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि जल बिरादरीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील १०८ नद्यांचा अभ्यास करण्यात आला. नद्यांविषयी जनजागृती करण्यासह त्या अविरल, निर्मळ आणि प्रवाही करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचाही अभ्यास करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पारंपरिक ज्ञान असलेले अभ्यासक, शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सहभागातून लोकअभ्यास व कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांच्या आधारे जलसंपदा विभाग आणि राज्य शासनाचे अन्य संबंधित विभाग समन्वयाने नदी संवर्धनाचे काम करणार आहेत.

जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी यावेळी महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन हा महत्त्वाचा विषय आहे, असे सांगत या पार्श्वभूमीवर विविध पातळीवर शासनाच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रात नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी या प्रयत्नांचा भाग म्हणून नाशिक येथे होणारा कार्यक्रम महत्त्वाचा ठरेल असे ते म्हणाले.

बैठकीस जल बिरादरीचे नरेंद्र चुघ, डॉ. सुमंत पांडे, अभिनेते चिन्मय उदगीरकर, महेंद्र महाजन, राजेश पंडित, मनोज साठे आदि प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचा अभ्यास करून आंध्र प्रदेशातही अशा प्रकारचा कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने जल बिरादरीचे राष्ट्रीय समन्वयक सत्यनारायण बोलशेट्टी यांनी बैठकीत सहभाग घेतला.

Total Visitors :

5428503
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या

Gramin Varta
2 Min Read

महिला शेतकऱ्यांना अधिकृत सन्मान; राज्यभरात प्रमाणपत्र नोंदणी व वितरणाची धडक मोहीम सुरू, १७ ऑक्टोबरपर्यंत संधी

Gramin Varta
2 Min Read

काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू, चौघे जखमी

Gramin Varta
2 Min Read

मजुराला धडक देऊन पसार झालेला चालक पाचलमधून जेरबंद; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लांजा पोलीस पथकाचा सन्मान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा,राज ठाकरेंची मागणी

4 Min Read
महाराष्ट्र

ब्रेकिंग: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

2 Min Read
महाराष्ट्र

सातबारा नावावर नसला तरी महिलांना मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री यांची घोषणा

2 Min Read
महाराष्ट्र

महामार्गांवर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना जीवनदान देण्यासाठी परिवहन विभागाचा पुढाकार; अपघातप्रवण पट्ट्यांत १०० नव्या रुग्णवाहिका तैनात होणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?