ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सावर्डे विद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर; तालुकास्तरीय स्पर्धेत दिमाखदार विजेतेपद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सावर्डे विद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर; तालुकास्तरीय स्पर्धेत दिमाखदार विजेतेपद
चिपळूण

सावर्डे विद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर; तालुकास्तरीय स्पर्धेत दिमाखदार विजेतेपद

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 3:21 pm
Gramin Varta
58 Views
Share

सावर्डे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एस. व्ही. जे. सी. टी. डेरवण येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षे मुले-मुली व १९ वर्षे मुले-मुली गटातील कबड्डी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या १४ वर्षे मुले कबड्डी संघाने दमदार कामगिरी करत तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानंतर सावर्डे विद्यालयाच्या संघाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दिमाखदार प्रवेश केला आहे.

चिपळूण तालुक्यातील विविध विद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. अंतिम लढतीत सावर्डे विद्यालयाच्या संघाने युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूणच्या संघावर मात करत विजेतेपद आपल्या नावावर केले. उत्कृष्ट सांघिक खेळ, आक्रमक चढाया आणि भक्कम बचावाच्या जोरावर सावर्डे संघाने सामन्यावर वर्चस्व राखत शानदार विजय मिळवला.

विजयी सावर्डे संघात आर्यन घाणेकर, अथर्व कानसे, रुद्र खापरे, नैतिक जाधव, ओंकार चव्हाण, अथर्व बेचावडे, नंदन घाणेकर, दीपराज चाळके, मानव भुवड, सर्वेश खापरे आणि तनिष कानसे या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

सावर्डे विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, उपाध्यक्ष प्रशांतशेठ निकम, युगंधरा राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, संस्थेचे विश्वस्त व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. या विजयामुळे सावर्डे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देशात 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू करणार – अमित शाह

Gramin Varta
4 Min Read

चांदीचे दर गडगडले; किलोमागे १३,२०० रुपयांची घसरण

Gramin Varta
2 Min Read

नेपाळला दिलासा : भारताकडून ३१ डिसेंबरपर्यंत १८ तास वीज निर्यातीला मंजुरी

Gramin Varta
1 Min Read

लावाने बोल्ड एन४ प्रो ५जी स्मार्टफोन केला लॉन्च

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू

1 Min Read
चिपळूण

चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पदरीत्या लपून बसलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात

1 Min Read
चिपळूण

चिपळूण: खेर्डी एमआयडीसीत संशयास्पदरीत्या फिरणारा तरुण तांब्याच्या तारांसह अटकेत

1 Min Read
चिपळूण

परशुराम घाटातील सवतसडा धबधब्यानजीक भीषण अपघात; ट्रेलर पलटी होऊन राजस्थानच्या चालकाचा जागीच मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?