ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूणच्या ज्येष्ठ डॉक्टरला तोतया पोलिसाकडून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २४ लाखांचा गंडा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूणच्या ज्येष्ठ डॉक्टरला तोतया पोलिसाकडून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २४ लाखांचा गंडा
चिपळूण

चिपळूणच्या ज्येष्ठ डॉक्टरला तोतया पोलिसाकडून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २४ लाखांचा गंडा

Gramin Varta
Last updated: November 7, 2026 9:56 am
Gramin Varta
187 Views
Share

चिपळूण : पोलिसांचा गणवेश परिधान करून आपण नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवत एका सायबर भामट्याने चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील ६५ वर्षीय डॉक्टरची तब्बल २३ लाख ९५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲप कॉल आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पोलिसांचा धाक दाखवत संबंधित डॉक्टरला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून ही रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास महादेव ओक (वय ६५, व्यवसायाने डॉक्टर, रा. बामणोली, डिंगणकरवाडी, ता. चिपळूण) यांना ३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. संजय पिसे असे नाव सांगणाऱ्या या व्यक्तीने पोलीस गणवेश परिधान करून आपण नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर व्हॉट्सॲप कॉल आणि व्हिडीओ कॉलद्वारे ओक यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या नावावरील एअरटेल सिमकार्डविरोधात २० जणांच्या तक्रारी असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या बँक खात्याचा वापर मनी लाँड्रिंगसारख्या आर्थिक गैरव्यवहारासाठी झाल्याचा आरोप करून त्यांना कारवाईची भीती दाखवण्यात आली.

या कथित पोलीस कारवाईच्या दबावाखाली आणून संबंधित भामट्याने ओक यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने एकूण २३ लाख ९५ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३१९(२), २०४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय पिसे असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5468412
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

जामदा धरण मोबदला घोटाळा: अस्तित्वात नसलेली झाडे दाखवून शासकीय निधी लाटल्याचा मनसेचा गंभीर आरोप; राजापूर पोलिसांत तक्रार दाखल

Gramin Varta
2 Min Read

शिष्यवृत्तीचा निधी रखडल्याने महाविद्यालये आर्थिक संकटात; रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचा आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

शाळेत शिपाई असणाऱ्या वडिलांच्या घामाचे पांग मुलाने फेडले; चिपळूणच्या तळवडे गावातील शुभम कोकरे बनले डॉक्टर, आई-वडिलांच्या संघर्षाला यशाची सलामी

2 Min Read
चिपळूण

चिपळूण : खेर्डी एमआयडीसीतील फर्निचर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

1 Min Read
चिपळूण

ग्रामीण महिला उद्योजकांचे आर्थिक क्षितिजावर कर्तृत्व; कन्साई नेरोलॅक व दिशान्तरच्या ‘स्वयम्’ उपक्रमातून तब्बल ४६.९८ लाखांची कमाई

2 Min Read
चिपळूण

चिपळुणात भटक्या श्वानांचा प्रश्न जैसे थे; नगरपरिषदेच्या अनास्थेमुळे नसबंदी, लसीकरण अन् ‘एबीसी’ सेंटरची प्रतीक्षा कायम

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?