ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘कोकणाची’ संस्कृती,परंपरा आणि मातीच्या नात्याला सुरेल मानवंदना
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘कोकणाची’ संस्कृती,परंपरा आणि मातीच्या नात्याला सुरेल मानवंदना
संगमेश्वर

‘कोकणाची’ संस्कृती,परंपरा आणि मातीच्या नात्याला सुरेल मानवंदना

Gramin Varta
Last updated: September 27, 2026 4:36 pm
Gramin Varta
50 Views
Share

संगमेश्वर : कोकणची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं, या भावनेतून ‘वाट कोकणाची’ हे सुंदर मराठी गीत साकारण्यात आलं आहे. कोकणच्या निसर्गासोबतच येथील जीवनशैली, परंपरा आणि पूर्वजांनी जपलेल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारं हे गीत सध्या कोकणप्रेमींच्या भेटीला आलं आहे.

वाट कोकणची – ज्योती भांडे, मालवणी टेल्स या नावाने हे गीत सादर करण्यात आलं असून, ज्योती भांडे आणि विजय मारापल्ली यांनी गीताचं संगीतबद्ध केलं आहे. तर लेखिका – कवयित्री ज्योती घनश्याम यांनी गीतलेखन केलं आहे. कोकणच्या मातीशी असलेलं नातं आणि या भूमीची ओढ गीतातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अकोल्याची मूळ असलेल्या ज्योती भांडे यांनी कोकणात भ्रमंती करताना या गाण्याची संकल्पना साकारली. कोकणचा निसर्ग, येथील संस्कृती आणि परंपरा जवळून अनुभवताना निर्माण झालेल्या भावनेतून ‘वाट कोकणाची’ या गीताची निर्मिती झाली.

या संकल्पनेला पुढे भांडुपमधील ‘मिनी कोकण ‘ टीमने आकार दिला. या टीममधील जवळपास निम्मे कलाकार स्वतः कोकणी असल्याने गाण्याच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचाही स्पर्श झाला आहे.त्यामुळे या गीताशी कलाकारांचं नातं अधिक भावनिक आणि जवळचं झालं आहे. कोकण म्हटलं की, निळाशार समुद्र, हिरवाईने नटलेले डोंगर, कौलारू घरं, गावाकडची जीवनशैली, सण-उत्सव आणि पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या परंपरा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. याच कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच कोकणापासून दूर असलेल्या कोकणकरांना आपल्या मातीची आठवण करून देण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे.

‘वाट कोकणाची’ हे केवळ एक गीत नसून कोकणच्या मातीशी असलेल्या भावनिक नात्याचा प्रवास आहे, अशी भावना या गीतामागील संकल्पनेतून व्यक्त होते. कोकणचा वारसा आणि पूर्वजांनी जपलेल्या परंपरा पुढील निर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने साकारलेलं हे गीत कोकणप्रेमींसाठी खास ठरत आहे.कोकणच्या मातीचा सुगंध आणि या भूमीची हाक अनुभवण्यासाठी ‘वाट कोकणाची’ हे गीत नक्की ऐका आणि मित्र-परिवारासोबत शेअर करा, असे आवाहन गीताच्या टीमकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत दापोलीच्या ईगल स्केटर्स क्लबचा सुवर्ण डंका; मुक्ता गोविलकर आणि आराध्या पाटणेची विभागीय फेरीत धडक

Gramin Varta
1 Min Read

चिपळूणमध्ये राधाई फाउंडेशनचा ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न; कर्तृत्ववान महिलांचा गौरव

Gramin Varta
2 Min Read

मंडणगडात भरदिवसा घरफोडी; कपाटातील लॉकर फोडून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
1 Min Read

गुहागर-चिपळूण मार्गावर एसटी बसला मालवाहू ट्रकची धडक; चालकासह मालकावर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरूख नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पातील दुर्गंधीविरोधात कांजिवरावासीय आक्रमक; कचऱ्याच्या घंटागाडीसह नगरपंचायतीवर धडक

2 Min Read
संगमेश्वर

Probing the Frontiers of Understanding and Treating Brain Disorders

7 Min Read
संगमेश्वर

देवरुख: कुडवलीच्या सांदीपनी गुरुकुल संस्थेत ६२०० वृक्षांच्या जंगलाची निर्मिती

2 Min Read
संगमेश्वर

संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?