ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: घरडा केमिकल्स लिमिटेडला FICCI चे राष्ट्रीय स्तरावरील दोन प्रतिष्ठित पुरस्कार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » घरडा केमिकल्स लिमिटेडला FICCI चे राष्ट्रीय स्तरावरील दोन प्रतिष्ठित पुरस्कार
चिपळूण

घरडा केमिकल्स लिमिटेडला FICCI चे राष्ट्रीय स्तरावरील दोन प्रतिष्ठित पुरस्कार

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 7:47 am
Gramin Varta
39 Views
Share

चिपळूण :-फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या वतीने रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणाऱ्या कंपन्यांचा गौरव करण्यासाठी ‘केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्री अवॉर्ड्स २०२६’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्यात घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे या कंपनीला दोन प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी निवडण्यात आले. कंपनीने कॉपर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी ‘उत्कृष्ट सामाजिक योगदान (CSR) पुरस्कार २०२६’, तर कंपनीमध्ये आधुनिक डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर केल्याबद्दल ‘डिजी टेक फ्रंट रनर ऑफ द इयर पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

घरडा केमिकल्स लिमिटेडने आपल्या CSR उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, गुहागर आणि दापोली तालुक्यांतील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक प्रकल्प राबविले आहेत. यामध्ये शैक्षणिक उपक्रम, पाणीपुरवठा योजना, महिला सक्षमीकरण, डिजिटल स्कूल प्रकल्प, विज्ञान प्रयोगशाळा, शाळा दुरुस्ती, शालेय स्वच्छतागृहांची उभारणी, दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींसाठी तपासणी आणि सहाय्यभूत साहित्य वाटप शिबिरे, कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प, वृक्षारोपण तसेच पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.

कंपनीमार्फत राबविण्यात येणारे हे प्रकल्प ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यास आणि स्थानिक समुदायाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यास महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

कंपनीच्या या विविध सामाजिक उपक्रमांचे राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर सादरीकरण करण्यात आले. या पुरस्कार प्रक्रियेत देशातील अनेक नामांकित रसायने व पेट्रोकेमिकल्स कंपन्यांनी सहभाग घेतला होता. सामाजिक विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य, प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकता, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या वैशिष्ट्यांमुळे घरडा केमिकल्स लिमिटेडने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. या पुरस्कारांमुळे कंपनीची सामाजिक बांधिलकी, समाजाच्या शाश्वत विकासाप्रती असलेला दृढनिश्चय आणि उत्कृष्ट कार्यपद्धती अधोरेखित झाली आहे.

या पुरस्कारांचे वितरण २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल ITC मराठा येथे आयोजित समारंभात करण्यात आले. या प्रसंगी भारत सरकारच्या रसायने व पेट्रोकेमिकल्स विभागाचे सचिव, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच देशातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावरील दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झाल्यामुळे घरडा केमिकल्स लिमिटेडच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. कंपनीच्या या यशामुळे सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रातील तिच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, भविष्यातही समाजोपयोगी आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5469279
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

आशियाई क्रीडा स्पर्धा: महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात भारत पाचव्या स्थानी;मनू भाकर अंतिम फेरी गाठण्यात अपयशी

Gramin Varta
1 Min Read

समुद्रात मध्यरात्री थरार: ‘ऑपरेशन निशाचर’ अंतर्गत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका; रायगडची अवैध एलईडी नौका अंजर्ले समुद्रात जेरबंद

Gramin Varta
2 Min Read

कोकणातील कुणबी समाजाच्या संघटनात्मक एकजुटीसाठी नेतृत्वाची पहिली बैठक संपन्न

Gramin Varta
3 Min Read

वरची निवेंडी समतानगर येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

पिंपळीतील दोन्ही पूल १५ जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुले होणार

2 Min Read
चिपळूण

चिपळूण बाजारपेठेत पालिकेचा अतिक्रमण हटाव बडगा; जुना स्टॅण्ड ते गांधी चौक मार्गावरील साहित्य जप्त, कारवाईदरम्यान बाचाबाची

2 Min Read
चिपळूण

चिपळूणच्या डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव यांना प्रतिष्ठेचा ‘एबीपी माझा आरोग्यरत्न’ पुरस्कार प्रदान

3 Min Read
चिपळूण

गरजू महिलांना स्वयंरोजगाराचे बळ; भाजप चिपळूण शहर मंडलातर्फे घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?