ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वरची निवेंडी समतानगर येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वरची निवेंडी समतानगर येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी

वरची निवेंडी समतानगर येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न

Gramin Varta
Last updated: October 5, 2026 2:18 pm
Gramin Varta
55 Views
Share

गणपतीपुळे (वैभव पवार) : भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा निवेंडी-समतानगर यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेतील १४ वे पुष्प येथील महाबोधी विहारामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात गुंफण्यात आले. ग्रामशाखेचे अध्यक्ष दिवाकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामशाखेचे सचिव मीनानाथ कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख प्रवचनकार तथा लांजा तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष, माजी श्रामणेर बौद्धाचार्य आदेश जाधव, अध्यक्ष दिवाकर कदम आणि मान्यवरांच्या हस्ते महाबोधी विहारातील तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले, तसेच उपस्थितांनी त्रिसरण व पंचशीलाचे सामूहिक ग्रहण केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, तालुका पदाधिकारी, माजी श्रामणेर व बौद्धाचार्य यांचा ग्रामशाखा व तालुका शाखेतर्फे गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास मुंबई कमिटीचे अध्यक्ष नागेश कदम, निवेंडीच्या सरपंच रविना कदम आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी जिल्हा पाली विभागाचे उपाध्यक्ष व तालुका संघटक दिलीप वासनिक यांनी वर्षावासाचे महत्त्व विशद करताना प्राचीन बौद्ध संस्कृती, सम्राट अशोकांचे शिलालेख व लेणींचा इतिहास समजून घेण्यासाठी धम्मलिपी व पाली भाषा शिकण्याचे आवाहन केले. त्यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व कसे?’ या विषयावर मुख्य प्रवचन सादर करताना बौद्धाचार्य आदेश जाधव यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर सविस्तर प्रकाश टाकला. लहानपणापासून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत असताना रामजी बाबा व त्यांच्या आत्यांनी दिलेले योगदान, वर्गाबाहेर बसून ज्ञानसाधना करत देशाचे संविधानकर्ते होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. तथागतांनी सांगितलेल्या शील, दान, उपेक्षा, त्याग, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान आणि करुणा या दसपारमितांचे पालन बाबासाहेबांनी आयुष्यभर केले; त्यांचा स्वार्थत्याग, दिनदुबळ्यांसाठीचा अहिंसक लढा आणि संविधानातून दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुतेची देणगी यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘बोधिसत्व’ आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. अभ्यासपूर्ण विवेचनासोबतच त्यांनी सादर केलेल्या प्रबोधनात्मक गीताने उपस्थित जनसमुदाय भावूक झाला होता.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अध्यक्ष दिवाकर कदम यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले, तर तालुका संस्कार विभाग सचिव स्वप्नील पवार यांनी नेटके आयोजनाबद्दल ग्रामशाखेचे कौतुक केले. सरणत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन यश चंद्रकांत कदम व स्वप्नील पवार यांनी केले. विशेष म्हणजे, ग्रामशाखेने नुकत्याच उभारलेल्या या विहाराच्या विकासानंतर आयोजित वर्षावास कार्यक्रमाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्थानिक माता सावित्रीबाई फुले महिला मंडळाने उचलल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या सोहळ्यास तालुका अध्यक्ष सुनील पवार, संस्कार विभाग उपाध्यक्ष प्रितम सावंत, नंदकुमार यादव, प्रमोद जाधव, अशोक यादव, सुधीर जाधव, दिलीप जाधव यांसह तालुक्यातील बहुसंख्य उपासक-उपासिका व धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामशाखेच्या वतीने सर्वांसाठी स्नेहभोजन व भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गुहागर-चिपळूण मार्गावर एसटी बसला मालवाहू ट्रकची धडक; चालकासह मालकावर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

शाळकरी मुलांनी मनसोक्त जगावे, खेळावे आणि वाचावे; मोबाइलचा वापर दिवसातून फक्त पाच मिनिटेच ठेवावा : सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांचे आवाहन

Gramin Varta
3 Min Read

लांजाच्या दिपराज-तीर्थाचा तायक्वॉंदोमध्ये दुहेरी सुवर्णवेध

Gramin Varta
2 Min Read

चिपळूणात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविणारा तरुण ताब्यात; ५० हजारांची दुचाकी जप्त

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी : कापडगाव येथील वळणावर भरधाव ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू

2 Min Read
रत्नागिरी

खेड आणि पूर्णगड येथून दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढ अपहरण; गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या जॅकप्रो महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीचा फराळ थेट पश्चिम बंगालमध्ये दाखल

2 Min Read
रत्नागिरी

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?