ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीच्या जॅकप्रो महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीचा फराळ थेट पश्चिम बंगालमध्ये दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीच्या जॅकप्रो महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीचा फराळ थेट पश्चिम बंगालमध्ये दाखल
रत्नागिरी

रत्नागिरीच्या जॅकप्रो महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीचा फराळ थेट पश्चिम बंगालमध्ये दाखल

Gramin Varta
Last updated: November 5, 2026 3:04 pm
Gramin Varta
126 Views
Share

रत्नागिरी (वैभव पवार): पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (10k प्रकल्प) संकल्पनेतून आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मार्गदर्शनाखाली आकारास आलेल्या तालुक्यातील एकमेव ‘जॅकप्रो महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी’ने आपल्या कर्तृत्वाचा नवा अध्याय लिहिला आहे. कोकणातील शेतकरी कुटुंबांतील सुमारे साडेसातशे महिला सभासदांच्या या कंपनीने पारंपरिक उत्पादनांपलीकडे जाऊन तयार केलेल्या रुचकर दिवाळी फराळाने आता थेट पश्चिम बंगालमधील घराघरांपर्यंत मजल मारली आहे. आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद आणि जांभूळ यांसारख्या हंगामी फळांच्या उत्पन्नाचा जानेवारी ते मे हा मुख्य काळ संपल्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या पोकळीवर कंपनीने सणासुदीच्या माध्यमातून मात केली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेजवळील संकेश्वर पार्क येथील ‘महिला किसान मार्ट’ आउटलेटच्या माध्यमातून वर्षभर उप-उत्पादने आणि प्रत्यक्ष फळांची विक्री करणाऱ्या या कंपनीने यंदाच्या गणेशोत्सव व दिवाळी सणाचे औचित्य साधून ‘दिवाळी फराळ किट’ आणि ‘अभ्यंग स्नान दिवाळी सुगंधी किट’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या उपक्रमामुळे कोतवडे जिल्हा परिषद गटासह ओरी आणि नेवरे भागातील तब्बल ५० महिलांना थेट रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली. महिलांनी पारंपरिक कौशल्याने बनवलेला हा फराळ अत्यंत चविष्ट आणि दर्जेदार ठरल्यामुळे स्थानिक स्तरावरून त्याला मिळालेली मागणी पुढे मुंबई आणि पुण्यातून विस्तारत थेट पश्चिम बंगालपर्यंत पोहोचली.

कंपनीच्या चेअरमन सौ. स्वरा वैभव देसाई, सेक्रेटरी हेमलता केशव गिडये, संचालिका शरयू संदीप देसाई, ज्योती मोरे, समृद्धी सोनार, भक्ती मोरे, रवीना कदम, निशिगंधा कोसुम्बकर यांच्या नेतृत्वाखाली, तसेच सीईओ सार्थक अजित कदम आणि अकौंटंट सायली चंद्रकांत पवार यांच्या व्यवस्थापनातून ही व्यावसायिक झेप शक्य झाली. याशिवाय पदार्थ निर्मिती, दर्जेदार पॅकेजिंग आणि विक्री व्यवस्थापनात वेदा विवेक देसाई व अमिता अमित देसाई यांचे मोलाचे योगदान लाभले. शेतकरी महिलांच्या श्रमाला सन्मान, मालाला योग्य भाव आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्याचे मूळ ध्येय या यशस्वी उपक्रमातून प्रत्यक्षात उतरल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Total Visitors :

5469136
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ताम्हिणी घाटातील मिल्कीबार वॉटरफॉलच्या खोल कुंडात बुडून पुण्याच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

पत्रकार वारीशे हत्या प्रकरणात पंढरीनाथ आंबेरकरला दिलासा नाही; दोन्ही जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळले

Gramin Varta
3 Min Read

‘मिशन पोलीस पाटील’ व ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत लांजात पोलीस अधीक्षकांकडून मार्गदर्शन; कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर भर

Gramin Varta
2 Min Read

पाचल येथे दुष्काळी पंचनाम्यांची लोकप्रतिनिधींकडून प्रत्यक्ष पाहणी; एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, प्रशासनाला सूचना

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या १३ हजार ४० घरगुती बाप्पांना भावनिक निरोप

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात एफडीएची धडक मोहीम; बेकायदेशीर सुट्या मसाल्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत ८४ किलोचा साठा जप्त

2 Min Read
रत्नागिरी

जिंदाल कंपनीविरोधात जयगडच्या भूमिपुत्रांचे आंदोलन तीव्र; दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयात दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?