ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी : हर्षवर्धन सकपाळ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी : हर्षवर्धन सकपाळ
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी : हर्षवर्धन सकपाळ

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 10:00 am
Gramin Varta
18 Views
Share

मुंबई : मागील ४०-४५ दिवसापासून पावसाने खंड दिला असून पीकं करपून गेली आहेत. दुष्काळ पडलेला असताना सरकार मात्र बैठका व चर्चा यात वेळ मारून नेत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहे, असा संतप्त प्रश्न विचारून अस्मानी व सुलतानी संकटात असलेल्या बळीराजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, हेक्टरी १ लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, शेतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे, शेतकरी संकटात आहे, बुलढाणा जिल्ह्यातील एका तरूण शेतकऱ्याने त्याचे २० एकर सोयाबीन मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांनाही आपल्या शेताची अवस्था पाहण्यास या, अशी आर्त विनंती केली होती पण कोणीही या शेतकऱ्याकडे फिरकले नाही. कृषीमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते पण तेही फिरकले नाहीत. महायुती सरकार हे आंघळं, बहिरं व मुकं सरकार आहे. शेतकरी सरकारकडे मायबाप म्हणून आशेने पहात असते पण या सरकारला त्यांचे काहीही पडलेले नाही. या शेतकऱ्याचे सांत्वन करणे हे माझे कर्तव्य आहे म्हणून मी या शेतकऱ्याची भेट घेतली. दुष्काळ हा राजकारण करण्याचा विषय नाही याचे भान आम्हाला आहे, पण सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे पण तसे होताना दिसत नाही.

राज्यातील शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत काजू बदामवर सत्ताधारी पक्षाचे खासदार ताव मारत आहेत, सरकारकडे संवेदनाच नाहीत. बळीराजाला तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सत्याग्रह करत आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी आंदोलन करत आहेत, सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला.

महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे, बुलढाणा जिल्ह्यातील या गावात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्याची नावे होती तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव आहे, या शेतकऱ्याला फक्त ४० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. सरकारचे दावे व वस्तुस्थिती यात मोठा फरक आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखाची आहे पण शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा: उड्डाणपुलावर भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू; चालक घटनास्थळावरून पसार

Gramin Varta
2 Min Read

पोलिओने पाऊल थांबवले, जिद्दीने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली; शाकीरा कुरेशींच्या जीवनात विवाहाने उमलली नव्या पर्वाची पहाट

Gramin Varta
4 Min Read

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Revolutionizing Entertainment Key Insights into the Digital Transformation Shift

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

बीआयएसने सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ७५ रुपयांपर्यंत केली वाढ, नवीन दर लागू

2 Min Read
महाराष्ट्र

परतीचा पाऊसही ठरणार तोकडा; धरणांतील साठा आणि करपलेल्या खरिपाला दिलासा मिळणे कठीण, राज्यात दुष्काळाचे सावट गडद

3 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा ‘आदर्श नोंदणी पॅटर्न’ आता देशभरात लागू होणार; केंद्राकडून प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाखांचे अनुदान जाहीर

3 Min Read
महाराष्ट्र

शाळेतून पत्नीला घेऊन परतताना काळाचा घाला;उभ्या पिकअपला दुचाकीची धडक, लेकीसह बापाचा अंत

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?