ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही – सुनील तटकरे
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही – सुनील तटकरे
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही – सुनील तटकरे

Gramin Varta
Last updated: November 7, 2026 8:11 am
Gramin Varta
13 Views
Share

मुंबई : सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही. मात्र, जर दिवंगत अजित पवार आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे केव्हाच विलीनीकरण झाले असते.

अजितदादांनी स्वतः आपल्याला या विलीनीकरणाची कल्पना दिली होती, असा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. इतकेच नव्हे तर, जर आज दादा असते, तर येत्या १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकत्र आले असते आणि आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध दिसली असती. मात्र अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ही संपूर्ण प्रक्रिया मागे पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. काल, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर आपली भूमिका मांडली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोर निर्माण झालेली परिस्थिती, नेतृत्व आणि भविष्यातील राजकीय दिशा यांवरून अनेक तर्कवितर्क सुरू असताना तटकरे यांच्या विधानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सुनील तटकरे यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतरच पुन्हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू झाली. या भेटीमध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. प्रफुल्ल पटेल तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. त्यावेळी काही राजकीय चर्चा झाली असेल पण ती नेमकी कुठल्या संदर्भात असं काही भाग नाही. या भेटीचा कुणी राजकीय अन्वयार्थ काढू नये, असे आवाहन तटकरे यांनी केले.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, सुनील तटकरेंनी सत्य परिस्थिती सांगितली. अजित पवार असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती. आज तटकरे म्हणत असले तरी आम्ही याबाबत यापूर्वीच आम्ही बोलत होतो, पण ती मानलं जात नव्हतं. ते तटकरे साहेब बोलल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं. आज दोन्ही पक्ष एकत्र असते तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालिका वगैरेचं चित्र वेगळं दिसलं असतं. दादांनाही तेच अपेक्षित होतं. पक्ष मजबुतीने ताकदीने उभा राहण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात हे शरद पवार आणि अजित पवारांना अपेक्षित होतं. त्यादृष्टीनेच विलीनीकरणाची चर्चा झाली होती.

Total Visitors :

5469363
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळावर मात करण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत कुरचुंब येथे वनराई बंधारा साकारला!

Gramin Varta
1 Min Read

कडवई रेल्वे स्थानक मार्गाची दुरवस्था; कोकण रेल्वेच्या दुर्लक्षामुळे रिक्षा संघटना आक्रमक, आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
1 Min Read

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदार संघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

घराच्या पडवीत शांत झोपलेल्या माऊल्यांवर काळाचा घाला; अंगावरील सोन्यासाठी दोन वृद्ध जीवांची क्रूर हत्या

2 Min Read
महाराष्ट्र

लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्येविरोधात ‘मोका’चा बडगा; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणार

2 Min Read
महाराष्ट्र

एसआयआरच्या मुद्द्यावरून ४ ऑक्टोबरला मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंचा संयुक्त जनमोर्चा

2 Min Read
महाराष्ट्र

मुंबईत राममंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूने दोघांचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?