ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजिवडा खाडीतील गाळ उपशाला गती द्या; कोअर कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजिवडा खाडीतील गाळ उपशाला गती द्या; कोअर कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी

राजिवडा खाडीतील गाळ उपशाला गती द्या; कोअर कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 6:22 pm
Gramin Varta
46 Views
Share

रत्नागिरी : राजिवडा खाडी व मांडवी खाडीमुखातील गाळ उपशाचे काम तातडीने सुरू करून सुरू असलेल्या ब्रेकवॉटरच्या कामास गती देण्याबाबत जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी व मच्छीमार संयुक्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राजिवडा खाडी व मांडवी खाडीमुखाशी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाळ, वाळू व सॅण्ड बार साचत असल्यामुळे मच्छीमारांच्या होड्यांच्या सुरक्षित ये-जा करण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आहे. विशेषतः छोट्या मच्छीमारांना कमी पाण्याची खोली व गाळामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नौका अडकणे, नुकसान होणे तसेच जिविताला धोका निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत.

या प्रश्नाची दखल घेत जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी तथा राजिवडा-फणसोप, भाट्ये, सोमेश्वर व करला परिसरातील मच्छीमार संयुक्त संघर्ष समितीने गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. यासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

या पाठपुराव्यादरम्यान जनता दरबारामध्ये पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची अनेकदा यांच्यासमोर गाळाचा बंधाऱ्याचा प्रश्न अनेकदा मांडण्यात आला होता. त्यांच्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला. तसेच खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन प्रश्न मांडण्यात आला. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल समितीने आभार मानले आहेत.

दरम्यान, भाट्ये येथे ब्रेकवॉटर / ग्रोयन्सचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे राजिवडा खाडीतील गाळ उपशाचे कामही लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे. ब्रेकवॉटर आणि गाळ उपसा ही दोन्ही कामे परस्परपूरक असून मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनावश्यक विलंब होऊ नये, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे. काही नागरिकांनी तांत्रिक व पर्यावरणीय शंका उपस्थित केल्या असल्या तरी त्या शंकांची कागदपत्रे व तांत्रिक अहवालाच्या आधारे तपासणी करावी, मात्र या कारणामुळे मच्छीमारांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीला विलंब होऊ नये, असे समितीने स्पष्ट केले आहे.

यावेळी राजिवडा कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, कार्याध्यक्ष इम्रान सोलकर, सल्लागार शकील दावत, रहीम दलाल, लुकमान कोतवडेकर आदि उपस्थित होते.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

हिमालयीन मोहिमेचे रत्नागिरी पोलिसांना समर्पण; होमगार्ड जवान आकाश पालकर यांचा अनोखा संकल्प

Gramin Varta
2 Min Read

आशियाई क्रीडा स्पर्धा: महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात भारत पाचव्या स्थानी;मनू भाकर अंतिम फेरी गाठण्यात अपयशी

Gramin Varta
1 Min Read

जिल्हा नियोजन बैठकीत आ. भास्कर जाधवांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; निधी वाटपातील पक्षपातावरून पालकमंत्र्यांना घेरले

Gramin Varta
3 Min Read

महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गावखडीत लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कोकणनगर येथे रेशन धान्याचे सुरळीत वितरण; ९८ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले धान्य

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या १३ हजार ४० घरगुती बाप्पांना भावनिक निरोप

2 Min Read
रत्नागिरी

अंमली पदार्थविरोधी मोहिमेत हलगर्जी खपवून घेणार नाही: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?