ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाची उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडून पाहणी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाची उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडून पाहणी
रत्नागिरी

मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाची उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडून पाहणी

Gramin Varta
Last updated: October 19, 2026 9:38 am
Gramin Varta
27 Views
Share

बांधकाम सुरू असतानाही अविरत सेवेबद्दल कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली

मालगुंड: प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नागरिकांना अविरत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविल्या जात असल्याबद्दल कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी समाधान व्यक्त केले आहे. डॉ. माने यांनी रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील दैनंदिन कामकाजाची आणि उपलब्ध सोयीसुविधांची सर्वांगीण पाहणी केली.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय आरोग्य योजना, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि आरोग्यविषयक अभिलेखांची सखोल तपासणी करून आढावा घेतला, तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुख, परिणामकारक व गतिमान करण्याच्या दृष्टीने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मौलिक सूचना करून मार्गदर्शन केले. बांधकामाच्या आव्हानात्मक काळातही आरोग्य सेवा अखंडित ठेवल्याबद्दल त्यांनी संपूर्ण वैद्यकीय पथकाच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले.

या पाहणी दौऱ्यावेळी उपसंचालक कार्यालयाचे सांख्यिकी अधिकारी तेजस पारपोळकर, रत्नागिरीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी, आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर, राहुल कोकणे, प्रमोद लिंगायत यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषिकेश डोके, आरोग्य सहाय्यक राजेंद्र रणसे, एलएचव्ही सीमा पाडवी, पीओ आस्वाद यादव, एलएसओ स्वप्नाली किनरे, मुख्यालय एएनएम स्वानंदी पवार, कनिष्ठ सहाय्यक विद्या मावळणकर, गणपतीपुळेचे एमपीडब्ल्यू विक्रम जाधव, सफाई कर्मचारी शैलेश जाधव, आशा गटप्रवर्तक श्रीमती आढाव, फ्लेबोटोमिस्ट श्रुतिका मोहित व राहुल जाधव यांच्यासह आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले असून, ग्रामीण जनतेला अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यास नवी दिशा मिळाली आहे.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात; केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला, चालक सुखरूप बचावला

Gramin Varta
2 Min Read

राज्यात दुष्काळ जाहीर; रत्नागिरीतील तीन तालुक्यांचा समावेश, शेतकऱ्यांना ‘या’ सवलती लागू

Gramin Varta
2 Min Read

साखरतर येथून कामावर गेलेल्या २७ वर्षीय तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

लांजा:धुंदरे येथे जिल्हा परिषद शाळा लांजा उर्दूच्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्त इशारा

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीतील झाडगाव येथे जुन्या वादातून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला; लोखंडी फाईट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत २,२९५ मुलांना होणार जंतनाशक गोळ्यांचे वाटप

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कापडगाव येथील वळणावर भरधाव ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?