ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्त इशारा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्त इशारा
रत्नागिरी

जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सक्त इशारा

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 8:29 pm
Gramin Varta
359 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली नळपाणी पुरवठा योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करत त्यांना भविष्यात थेट काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा सक्त इशारा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

भविष्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांना वेळेत पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि महावितरणने आपापसात योग्य समन्वय ठेवून प्रलंबित कामे जलदगतीने मार्गी लावावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. विकासकामांमध्ये स्थानिक नागरिक किंवा अन्य कुणी अडथळा निर्माण करत असल्यास संबंधितांवर पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल दाभोळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्यासह मतदारसंघातील ठेकेदार उपस्थित होते.

या दौऱ्यादरम्यान डॉ. सामंत यांनी शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अडचणींचीही प्रत्यक्ष दखल घेतली. महाविद्यालयात प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची कमतरता, अद्ययावत प्रशिक्षणाचा अभाव आणि प्रयोगशाळेत पुरेशी उपकरणे नसणे अशा गंभीर समस्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. यावर विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक अडचणी तातडीने सोडविल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तसेच महाविद्यालयात ‘टेक्निकल फेस्टिव्हल’ आणि ‘ऑटो एक्स्पो’सारख्या राज्यस्तरीय उपक्रमांच्या आयोजनासाठी सर्वतोपरी शासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी प्राचार्य सुधीर अकोजवार, विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.

दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण आढाव्यात मच्छिमार आणि मत्स्यकास्तकारांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. ९ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी क्षेत्राप्रमाणेच सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत प्रक्रिया उद्योग वगळता मत्स्यसंवर्धकांना कृषी दराने वीज पुरवठा करण्याच्या तरतुदीनुसार मत्स्यव्यवसाय विभागाने पाठविलेल्या ५६ प्रस्तावांपैकी २२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. या सर्व मंजूर प्रस्तावांना महावितरणने तत्काळ कृषी दराने वीज पुरवठा सुरू करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त जीवन सावंत, नगरसेवक बंड्या साळवी, माजी नगरसेवक सुदेश मयेकर आणि ॲड. समृद्धी मयेकर उपस्थित होते.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कोयना खोऱ्यात मध्यरात्री भूकंपाचे पाच सौम्य धक्के

Gramin Varta
2 Min Read

Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway

Sponsored by

व्हीलचेअरवरून थेट आकाशात; रत्नागिरीतील नऊ दिव्यांगांचा मुंबई-गोवा अविस्मरणीय विमान प्रवास

Gramin Varta
5 Min Read

टाटा एरिस सेडान भारतात लाँच

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

‘स्कील इज फ्युचर’; तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी कौशल्ये सातत्याने अपग्रेड करावीत: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: उधारीच्या पैशांच्या वादातून मच्छीमारावर जीवघेणा हल्ला; डोक्यात कोयती मारून गालाचा चावा

1 Min Read
रत्नागिरी

शासकीय तंत्रनिकेतन व ‘एकता’ असोसिएशनमध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार; टू व्हिलर मेकॅनिक क्षेत्रातील कौशल्यविकासाला मिळणार नवी दिशा

1 Min Read
रत्नागिरी

शिरगावच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात जीवनरक्षक सीपीआर प्रशिक्षण

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?