ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा; रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा; रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई
रत्नागिरी

अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा; रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 10:50 am
Gramin Varta
76 Views
Share

रत्नागिरी: जिल्ह्यातील समुद्र आणि किनारी भागात सुरू असलेल्या अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. गस्तीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली असून, यामध्ये दोन स्क्विड जिगिंग नौका आणि एलईडी दिव्यांचा वापर करणाऱ्या एका नौकेचा समावेश आहे.

मत्स्य विभागामार्फत रत्नागिरी किनारपट्टीवर नियमित गस्त आणि तपासणी मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, २२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या गस्तीवेळी दोन स्क्विड जिगिंग नौकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ‘सानिया हफ्सा’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-3851, मालक: सिकंदर जैनुद्दीन फणसोपकर) आणि ‘एच. सिमाक’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-601, मालक: सुलताना अख्तर होडेकर) या दोन नौकांचा समावेश आहे.

तसेच, दुसऱ्या एका कारवाईत २३ सप्टेंबर २०२६ रोजी करला जेट्टी येथे तपासणी करताना ‘गुरुप्रसाद’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-3766, मालक: सुगंधा सुरेश ताकले) ही नौका एलईडी दिव्यांनी सुसज्ज असल्याचे निदर्शनास आले. या नौकेवरही मत्स्य विभागामार्फत नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

अवैध मासेमारीच्या प्रकारांना संपूर्ण आळा घालण्यासाठी यापुढेही समुद्रात तसेच जेट्टी व बंदर परिसरात गस्त आणि तपासणी मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. सर्व मच्छीमार व नौका मालकांनी मत्स्य व्यवसायातील नियमांचे काटेकोर पालन करूनच मासेमारी करावी, असे आवाहन मत्स्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :

5427459
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वरच्या चार एक्सप्रेससाठी ‘उंदीरमामा’ मैदानात!

Gramin Varta
1 Min Read

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

Gramin Varta
2 Min Read

पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: बोटीवर स्वयंपाक करताना गॅसचा भडका; गंभीर भाजलेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी शहरात अमली पदार्थविरोधी कारवाई; हेरॉईनसदृश पदार्थासह दोघे ताब्यात

3 Min Read
रत्नागिरी

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी धडक; १६ गुन्हे दाखल करत २२ जणांना ठोकल्या बेड्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?