राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील एका घराच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा दारू विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या दोन व्यक्तींविरोधात नाटे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास विद्याधर अणसुरकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घडली.
या प्रकरणी पोलिस शिपाई सचिन देवीदास आडबे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये प्रकाश महादेव पवार (वय 55, रा. कशेळी सावरेवाडी, ता. राजापूर) आणि विनायक रामचंद्र बांदकर (वय 44, रा. नाटे बांदकरवाडी, ता. राजापूर) यांचा समावेश आहे.
पोलिस नोंदीनुसार, आरोपींनी बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने देशी दारू व गोवा बनावटीची दारू विनापरवाना ताब्यात बाळगली होती.
कारवाईदरम्यान एकूण 2,960 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. त्यात 450 रुपये किमतीच्या देशी दारू संत्रा सॉफ्टच्या 180 मिली क्षमतेच्या 9 सीलबंद बाटल्या, 1,440 रुपये किमतीच्या देशी दारू संत्राच्या 180 मिली क्षमतेच्या 18 सीलबंद बाटल्या, 680 रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या मॅकडॉल क्रमांक 1च्या 180 मिली क्षमतेच्या 8 सीलबंद बाटल्या आणि 390 रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या हायवर्ड फाइन व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 13 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी नाटे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 100/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूरमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई; दोघांविरोधात गुन्हा
Leave a Comment





