ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर: ओणी हायस्कूल समोरून पंचायत समिती कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर: ओणी हायस्कूल समोरून पंचायत समिती कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास
राजापूर

राजापूर: ओणी हायस्कूल समोरून पंचायत समिती कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास

Gramin Varta
Last updated: October 25, 2026 11:50 am
Gramin Varta
235 Views
Share

राजापूर: राजापूर तालुक्यातील ओणी हायस्कूल समोर पार्क केलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक संदीप दिनकर निचिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचे सोळांकूर (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले संदीप निचिते (वय ४४) हे सध्या राजापूर तालुक्यातील ओणी येथील हायस्कूल समोरील साई विमलेश्वर हॉल परिसरात वास्तव्यास असून, ते राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस गाडी (क्रमांक MH ०९ GH ५१०३) नेहमीप्रमाणे साई विमलेश्वर हॉल समोर उभी करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी, २४ ऑक्टोबर रोजी शनिवारची साप्ताहिक सुट्टी असतानाही कार्यालयातील महत्त्वाच्या कामासाठी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ते बाहेर पडले असता, त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही.

गाडी चोरीला गेल्याचा संशय येताच त्यांनी तात्काळ ओणीचे पोलीस पाटील संजय लिंगायत तसेच आपले स्थानिक मित्र नामदेव नडे यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मित्र संग्राम भावके यांच्या मदतीने निचिते यांनी ओणी परिसर, पाचल फाटा तसेच ओणी बाजारपेठेत सर्वत्र शोध घेतला; मात्र दुचाकीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुमारे २० हजार रुपये किमतीची ही मोटारसायकल लबाडीने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या तक्रारीच्या आधारे राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २७२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीतून आणि वर्दळीच्या ठिकाणाहून दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला गेल्याने स्थानिक वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, राजापूर पोलीस या चोरीप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5470391
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिवेलीतील ३३ लाखांच्या पेयजल योजना घोटाळ्यात कारवाईला टाळाटाळ; संतप्त ग्रामस्थांची पाणी पुरवठा विभागावर धडक, १० दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन

Gramin Varta
2 Min Read

लांज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; सौरभ अनंत आयरे यांनी संपादन केली पीएच.डी. पदवी

Gramin Varta
2 Min Read

मंडणगड : लाटवण विजेच्या तारेचा तीव्र धक्का लागून १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

देवरुख पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांची महत्त्वाची बैठक संपन्न

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

पाचल येथे धनगर समाज संस्थेचा दसरा व स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात; पारंपरिक गज नृत्य ठरले लक्षवेधी

2 Min Read
राजापूर

पाचलमध्ये अपर तहसील कार्यालय व्हावे यासाठी कृती समितीचा लढा कायम; अंतिम निर्णयाकडे राजापूरवासीयांचे लक्ष

4 Min Read
राजापूर

जामदा धरण मोबदला घोटाळा: अस्तित्वात नसलेली झाडे दाखवून शासकीय निधी लाटल्याचा मनसेचा गंभीर आरोप; राजापूर पोलिसांत तक्रार दाखल

2 Min Read
राजापूर

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?